spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

११० कोटींचा ‘सोंड्याटोला’ प्रकल्प वाऱ्यावर; सुरक्षा रक्षकांना १२ तासांचे मिळतात केवळ २०० रुपये!

हंसराज, प्रतिनिधी भंडारा सिहोरा :- शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेल्या महत्वाकांक्षी सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पात तैनात आलेल्या सुरक्षा रक्षकावर अन्याय होत असल्याचे वृत्त नुकतेच पुढे आले आहे.एका सुरक्षा रक्षकाला महिन्याकाठी 6 हजार रुपये मानधन दिल्या जात आहे. 12 तास सेवा दिल्यानंतरही फक्त 200 रुपये दर दिवसाला दिले जात आहे. मानधनात वाढ करण्याची मागणी सुरक्षा रक्षक करीत आहेत. परंतु निविदा कंत्राटदार याकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची पाळी आल्याचे सांगितले जात आहे.

सातपुडा पर्वताच्या सानिध्यात व घनदाट जंगलात असणाऱ्या महत्वाकांक्षी सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पात सुरक्षा रक्षकांची नियुक्ती निविदा कंत्राटदाराने केली आहे. सुरक्षा रक्षकांच्या कर्तव्यासाठी दोन सिप्ट तयार करण्यात आलेल्या आहेत. सकाळ ते सायंकाळ आणि सायंकाळ ते सकाळ असे दोनच सिप्ट आहेत. यात 3 सुरक्षा रक्षक कर्तव्य बजावत आहेत. सकाळ पाळीत 1 व रात्र पाळीत 2 सुरक्षा रक्षक कर्तव्य बजावत आहेत. सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करताना कोणतीही अट नाही. मग तो महाराष्ट्राचा असो किंवा मध्यप्रदेशातील नागरीक त्याची सुरक्षा रक्षक पदावर नियुक्त केली जात आहे. या सुरक्षा रक्षकांना महिन्याचे 6 हजार रुपये मानधन दिले जात आहे. 12 तास जंगलात जीवाची पर्वा न करता जीव मुठीत धरून आपले कर्तव्य बजावत आहेत. त्यांना प्रत्येकी 200 रुपये हे तुटपुंजे दर दिले जात आहे. हे दर अल्प असल्याने अनेक वेळा मानधनात वाढ करण्याची मागणी केली परंतु निविदा कंत्राटदार दुर्लक्ष करीत असल्याचे सांगितले जात आहे.

सुरक्षा रक्षकांना कोणत्याही सेवा आणि सुविधा उपलब्ध नाहीत. सुरक्षा रक्षकांची हजेरी बुक नाही. दिवाळीत बोनस सुद्धा दिले जात नाहीत.110 कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या प्रकल्पाच्या सुरक्षा रक्षकांना वाऱ्यावर सोडण्यात आल्याचे विदारक चित्र सध्या दिसून येत आहे.

सोंड्या टोला उपसा सिंचन प्रकल्पात 3 सिप्ट करण्याची आवश्यकता असतांना 2 सिप्टवर काम भागविले जात आहे. 6 सुरक्षा रक्षकाची गरज असताना फक्त 3 सुरक्षा रक्षक नियुक्त आहेत. प्रकल्पात एका सिप्टमध्ये 2 सुरक्षा रक्षक नियुक्तीचे नियोजन आहे. निविदा कंत्राटदार नियुक्तीला हरताळ फासत असल्याचे दिसून येत आहे. सकाळ पाळीत एका सुरक्षा रक्षकांची जागा रिक्त असतांना भरली जात नाही. प्रकल्प परिसरात वाघ, बिबट्या हे वन्य प्राणी फेरफटका मारत आहेत.यापूर्वी प्रकल्पात साहित्य चोरीचे प्रकरण झालेले आहेत. याकडे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने सुरक्षा रक्षकांच्या मनात असंतोष खदखदत आहे. तुटपुंज्या मानधनावर आपले कर्तव्य चोख बजावत असतांनाही मागील दोन महिन्यापासूनचे मानधन थकल्यामुळे उदरनिर्वाहाचा प्रश्न त्यांच्यापुढे उभा टाकला आहे.

Popular Articles