spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

२८ ऑक्टोबर रोजी बिनाकी ब्रांच फिडरवर १२ तासांचे शटडाउन 

नागपूर :- एनएमसी-ओसीडब्ल्यू मार्फत बिनाकी ESR ब्रांच फीडर चा २८-१०-२०२६ रोजी सकाळी १०.०० वाजल्यापासून ते रात्री १०.०० वाजेपर्यंत (एकूण १२ तास) शटडाऊन नियोजित करण्यात आला आहे. बिनाकी-२ ESR च्या इनलेट फ्लो मीटरची दुरुस्ती/बदलणीचे काम करण्यासाठी हा शटडाऊन आवश्यक आहे.

या शटडाऊनमुळे खालील क्षेत्रांमध्ये पाणीपुरवठा बाधित राहील

१. बिनाकी एक्झिस्टिंग ईएसआर सीए – पंचशील नगर, आदर्श नगर, राणी दुर्गावती चौक, महेंद्र नगर, महर्षी दयानंद नगर, पंचकुवा, मेहंदी बाग कॉर्नर, खंते नगर, सुजाता नगर, फारुक नगर, नई बस्ती, बाबा बुद्धजी नगर, कुंभारटोली, कब्रस्तान परिसर.

२. बिनाकी ईएसआर १ सीए – संगम नगर, हमीद नगर, केजीएन सोसायटी, प्रवेश नगर, यशोधरा नगर, संघर्ष नगर, पांडे बस्ती, योगी अरविंद नगर, शिवशक्ती नगर, पवन नगर, पीएमएवाय वसाहत, टिपू सुलतान स्क्वेअर परिसर, मेहबूब पुरा.

३. बिनाकी ईएसआर २ सीए – इंदिरा माता नगर, संजय गांधी नगर, गोंड मोहल्ला, आनंद नगर, राणी दुर्गावती चौक परिसर, कांजी हाऊस परिसर, मोहम्मद रफी स्क्वेअर परिसर, एकता नगर, यादव नगर, यादव नगर गृहनिर्माण मंडळ, सुदाम नगर, चिमुरकर ले-आऊट, ताटघाट नगर, प्रबुद्ध नगर, भांडे नवाझ नगर, स्वीपर कॉलनी, धम्म दीप नगर, पंचवटी नगर, बोकडे लेआउट, बँक कॉलनी

या पाणीपुरवठा बंददरम्यान नागरिकांनी आवश्यक तेवढा पाणी साठा करून ठेवावा व पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

पाणीपुरवठा किंवा बिल भरण्याबाबत अधिक माहिती अथवा मदतीसाठी, ग्राहक NMC–OCW हेल्पलाइन क्रमांक 1800 266 9899 वर संपर्क साधू शकतात, contact@ocwindia.com या पत्त्यावर ईमेल करू शकतात किंवा Play Store अथवा App Store वरून ‘Nagpur Jal Grahak Sewa App’ डाउनलोड करू शकतात.

Popular Articles