spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

नागपूर शहरातील एकल महिलांनी ऑनलाईन सर्वेक्षण व नोंदणी करावी

– महापौर अन् आयुक्त यांचे आवाहन

नागपूर :- महाराष्ट्र शासन, महिला व बाल विकास विभागाच्या निर्देशानुसार एकल महिलांच्या सक्षमीकरणाच्या दृष्टीने राज्यातील सर्व महानगरपालिकांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील एकल महिलांचे सर्वेक्षण व नोंदणी करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. ही नोंदणी महत्त्वपूर्ण असून, नागपूर शहरातील सर्व एकल महिलांनी सदर ऑनलाईन सर्वेक्षणात सहभाग नोंदवून आपली संपूर्ण माहिती अचूकपणे भरून नोंदणी करावी, असे आवाहन महापौर श्रीमती निता ठाकरे व आयुक्त डॉ. विपीन यांनी केले आहे.

नागपूर महानगरपालिकेमार्फत नागपूर शहरातील एकल महिलांचे सर्वेक्षण व नोंदणी घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने करता यावी, यासाठी नागपूर महानगरपालिके मार्फत ऑनलाईन नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. एकल महिला सर्वेक्षण नोंदणी Link – http://admin-dept-portal.emergent.host या संकेतस्थळावर करता येईल. नागपूर शहरातील सर्व एकल महिलांनी सदर ऑनलाईन लिंकवर जाऊन आपली माहिती भरून नोंदणी करून घ्यावी. एकल महिलांच्या सामाजिक, आर्थिक व शासकीय योजनांशी संबंधित सक्षमीकरणासाठी ही नोंदणी महत्त्वपूर्ण असून, एकल महिलांनी या उपक्रमास सहकार्य करून आपली नोंदणी पूर्ण करावी. नागपूर शहरातील सर्व एकल महिलांनी या संधीचा लाभ घेऊन लवकरात लवकर ऑनलाईन नोंदणी करावी, असे आवाहन महापौर निता ठाकरे व आयुक्त डॉ. विपीन यांनी केले आहे.

Popular Articles