spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

अवैध गोवंश वाहतूक प्रकरणी २ गुन्हे; ६ आरोपी अटक, ६२ जनावरे मुक्त, ४९.३० लाखांचा मुद्देमाल जप्त

मौदा :- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक अवैध धंदयांवर कारवाई कामी कन्हान उपविभागात पेट्रोलींग करीत असतांना त्यांना गुप्तबातमीदाराने माहीती दिली की, गोवंश जनावरांची अवैधरित्या वाहतुक केली जात आहे मिळालेल्या माहीतीच्या आधारे नमुद पथकाने सतर्क पेट्रोलींग करीत मौजा बडोदा उड्‌डाण पुलाचे उताराचे पुर्वी हायवे रोडवर नाकाबंदी केली असता एक संशयीत ताडपत्रीने झाकलेला १२ चक्का ट्रक क्रमांक एम ३४ ए व्ही ०३७२ हे मिळुन आले. वाहन थांबवुन वाहनाची पाहणी केली असता चालकासह तीन आरोपी मिळुन आले. त्यांना नाव पत्त विचारले असता १) चालक आरोपी नामे शितलसिंग रामलखन राठोड, वय ४१ वर्ष, रा. टेकानाका, नागपुर चलकासह मिळुन आलेले आरोपी २) इब्राहिम कुरेशी बाबु कुरेशी, वय ३४ वर्षे, रा पोस्टे यशोधराच्या मागे, नागपूर, आणि ३) अभय चंदनलाल यादव, वय ३२ वर्षे, रा मांजरी, नाका कं २ नागपुर अशी माहीती समजली. नमुद आरोपीतांना ताब्यात घेतले. पंचासमक्ष वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये २९ गोवंश जनावरे असे मिळुन आले. तसेच नमुद पथकाने उमरी फाट्याजवळ हायवे वर नाकाबंदी केली असता एक संशयीत ताडपत्रीने डाला झाकलेला आयशर ट्रक क्रमांक एम ४० सीटी २०७४ हे मिळुन आले. वाहन थांबवुन वाहनाची पाहणी केली असता चालकासह तीन आरोपी मिळुन आले. त्यांना नाव पत्त विचारले असता १) चालक आरोपी नामे आमीर अली असलम अली, वय ३० वर्ष रा. कमर कॉलनी, कामगार नगर, नागपुर चलकासह मिळुन आलेले आरोपी २) रिझवान शेख इल्लु शेख शाहरूखउद्दीन शेख वलीउ‌द्दीन शेख माहीती समजली. नमुद आरोपीतांना ताब्यात घेतले. पंचासमक्ष वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये ३३ गोवंश जनावरे असे मिळुन आले. दोन्ही वाहनातील गोवंश जनावरांना कोणतीही चारापाण्याची सोय न करता, अंत्यत कमी जागेत दाटीवाटीने कोंबुन, शिंगाला व पायाला आखुड दोरखंडाने बांधुन, चारा पाण्याची व्यवस्था न करता निर्दयीतेने वाहतुक करीत असल्याचे दिसुन आले.

पोलीसांनी पंचासमक्ष वर नमुद दोन्ही वाहने किंमती किंमती ४०,००,००० /- रूपये आणि ६२ गोवंश जनावरे किंमती ९,३०,००० /- रूपये असा एकुण ४९,३०,००० /- रूपयांचा मुददेमाल जप्त केला आहे. सुटका केलेल्या जनावरांना ज्ञान फाउंडेशन लाखनी या गोशाळेत देखभालीकरीता दाखल करण्यात आले. नमुद ६ आरोपीतांना अटक करण्याची प्रकीया सुरू आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.