नागपुर १६ : पोलीस स्टेशन बेला दिनांक १४/०७/२०२५ रोजी ते १५.०७.२०२५ रोजी मध्यरात्री दरम्यान दिपक अग्रवाल, सहा. पोलीस अधिक्षक तथा उपविभागिय पोलीस अधिकारी नागपुर विभाग, नागपुर यांनी जिल्हा गस्त दरम्यान आणि सहा पोलीस निरीक्षक सी.बी. चौहाण, प्रभारी अधिकारी बेला यांनी विभागीय गस्त दरम्यान मौजा निमनाहारी शिवारातुन तेलगांना राज्यात काही इसम अवैध्यरित्या दारू ची तस्करी करीत आहे अशा खबरे वरून सापळा रचुन खालील प्रमाणे कारवाई करून दोन गुन्हे नोंद केले आहे.
राज्य कारवाई के १- नागपुर ते चंद्रपुर रोडवरील रामदेव बाबा धावा येथे आरोपी के १) रमना सावया करवेद, वय ४७ वर्षे, रा. घर के ०७/१३१ – २ आत्मकुर जि. वरंगल तेलंगना आणि आरोपी के २) रणधीर कोरमा रेड्डी वय ४५ वर्षे, रा. घर के ०१/३७रघुनाथपल्ली, ता. जफरगड, जि. जलगम, राज्य तेलंगना यांचे कार क. एच आर २६ डी ई ७६११ मध्ये विदेश दारू मिळुन आल्याने नमुद आरोपीतांच्या ताब्यातुन पंचासमक्ष कार क. एच आर २६ डी ई ७६११ किंमती ४,००,०००/- रूपये आणि ०१) विदेशी दारु जॉनीवाकर रेड लेबल व्हिस्की ०२) विदेशी दारु रॉयल स्टॉग व्हिस्की किंमती ८३,५२०/- रूपये असा एकूण ४,८३,५२०/- रूपयेचा माल जप्त करण्यात आला आहे. नमुद आरोपीतांवर पो.स्टे. बेला येथे अपराध कंमाक २५१/२५ कलम ६५ (अ) (ई) मदाका अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. कारवाई के २ नागपुर ते चंद्रपुर रोडवरील रामदेव बाबा धावा येथे आरोपी के १) करनाकर गोपाल बुरा, वय ३८ वर्षे, रा घर के ०१/०७ बसस्टॉप च्या मागे गुन्नीपारती जि. हनमकोंडा,
राज्य तेलंगना आणि आरोपी के २) राजरेडी रामरेडी रायडी, वय ४५ वर्षे, रा. घर के ०२/८३ कन्टामकुर, ता. परकाल जि. हनमकोंडा, राज्य तेलंगना यांचे कार क. एच आर ५१ वी ई ५५६७ मध्ये विदेशी दारू मिळुन आल्याने नमुद आरोपीतांच्या ताब्यातुन पंचासमक्ष कार क. एच आर ५१ बी ई ५५६७ किमती २,००,०००/- रूपये आणि ०१) विदेशी दारु जॉनीवाकर रेड लेबल व्हिस्की ०२) विदेशी दारु रॉयल स्टॉग व्हिस्की किमती ४७,७६०/- रूपये असा एकुण २.४७७६० रूपयेचा माल जप्त करण्यात आला आहे. नमुद आरोपीतांवर पो.स्टे. बेला येथे अपराध कंमाक २५२/२५ कलम ६५ (अ) (ई) मदाका अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे
वरील कारवाईत एकूण ७.३१,२८०/- रूपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
Home Latest News अवैधरित्या विदेशी दारूची वाहतुक करणाऱ्या आरोपीतांवर २ गुन्हे नोंद २ चारचाकी वाहनासह...



