२३९ ग्रॅम गांजासह ₹८ हजारांचा मुद्देमाल जप्त; १ आरोपी अटक

0
66

वडोदा :- अंमली पदार्थ विरोधी कारवाई पथक हे कन्हान उपविभागात पेट्रोलींग करीत असतांना त्यांना गुप्त बातमीदाराने अंमली पदार्थ गांजा बाबत खात्रीशिर माहीती दिली. नमुद पथकाला पेट्रोलींग दरम्यान नागपुर ते वडोदा रोडवर एक इसम बॅग घेवुन उभा दिसुन आला. नमुद इसम शासकिय पोलीस वाहन पाहुन त्याची बॅग घेवुन भोवरी गावाकडे जाणाऱ्या रोड ने पळुन जावु लागला. अंमली पदार्थ विरोधी कारवाई पथक यांनी सदर माहीती वडोदा पोलीस स्टेशनला देवुन त्यांच्या सह संयुक्त कारवाई करत आरोपीचा शिताफिने पाठलाग करून त्याला खंडेलवाल वेअर हाउस समोर पकडले. आरोपीला नाव पत्ता विचारपुस केली असता त्याचे नाव प्रफुल्ल यशवंतराव नगरारे, वय ३३ वर्षे, रा. वार्ड क्र. ४, नांद, ता. भिवापुर जि. नागपुर ह.मु. प्रधानमंत्री आवास योजना बिल्डींग क्र ६२ सिम्बॉसीस कॉलेज रोड जवळ, वाठोडा, नागपुर अशी माहीती प्राप्त झाली. पोलीसांनी पंचासमक्ष त्याच्या ताब्यातील बॅगची झडती घेतली अंमली पदार्थ गांजा मिळुन आला. नमुद आरोपीच्या ताब्यातुन १) अंमली पदार्थ गांजा वजन २३९ ग्रॅम किंमती ५०००/- रुपये, रोख रक्कम, छोटया मोठ्या आकाराच्या प्लॉस्टीक पिशव्या आणि मोबाईल असा एकुण ८,०००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

नमुद प्रकरणी आरोपीविरूद्ध पोलीस स्टेशन वडोदा येथे एन.डि.पि.एस. कायदयान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपीला अटक करण्याची प्रक्रीया सुरू आहे.