spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

अस्वच्छता करणाऱ्यांवर 24 प्रकरणं नोंद; उपद्रव पथकाची कारवाई

नागपूर, ता. २४ : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाद्वारे सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, 79 मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई केली जात आहे. बुधवार (ता.23)  रोजी शोध पथकाने 24 प्रकरणांची नोंद करून 32,600/- रुपयाचा दंड वसूल केला. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. 400/- दंड)  या अंतर्गत 25 प्रकरणांची नोंद करून 10,000/- रुपयांची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रू.400/-दंड) या अंतर्गत 01 प्रकरणांची नोंद करून 400/- रूपयांची वसुली करण्यात आली.मॉल, उपहारगृहे, लॉजिंग, बोर्डींग हॉटेल, सिनेमा हॉल, मंगल कार्यालय, कॅटरर्स सर्व्हिस  प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ता या अंतर्गत 01 प्रकरणांची नोंद करून 2,000/-रुपयांची वसुली करण्यात आली.वाहतूकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 07 प्रकरणांची नोंद करून 10,000/- रुपयांची वसुली करण्यात आली. चिकन सेंटर, मटन विक्रेता यांनी त्यांचा कचरा रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी टाकणे या अंतर्गत 01 प्रकरणांची नोंद करून 1,000/- रुपयांची वसुली करण्यात आली. . सार्वजनिक रस्ता,फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी बांधकामाचा मलबा/टाकावू कचरा टाकणे/साठवणे या अंतर्गत 02 प्रकरणाची नोंद  करून रू.2,000/- चे दंड वसुल करण्यात आले.  उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास 06 प्रकरणांची नोंद करून 1,200/- दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास 06 प्रकरणांची नोंद करून रु.6,000/- चे दंड वसूल करण्यात आलेला आहे. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

तसेच उपद्रव शोध पथकाने लक्ष्मीनगर झोन अंतर्गत मे.सफायर अपार्टमेंट  यांच्यावर सी अँड डी कचरा टाकल्याबद्दल रू.5,000/- चे दंड वसुल करण्यात आले. तसेच रूतम सराफ यांच्यावर रस्त्यालगत अनधिकृतरित्या झोपडे बांधल्याने रू.5,000/- रूपयांचे दंड वसुल करण्यात आले. धरमपेठ झोन अंतर्गत मे.आशीष कंस्ट्रक्शन व मे.लक्ष्मी केशव कंस्ट्रक्शन्स यांनी बांधकामाचे साहित्य रस्त्यालगत टाकल्याबद्दल प्रत्येकी रु. 10,000/-या प्रमाणे रू.20,000/- चे दंड वसूल करण्यात आले. नेहरूनगर झोन अंतर्गत मे.श्री.साई लिला अपार्टमेंट यांनी बांधकामाचे साहित्य रस्त्यालगत टाकल्याबद्दल रु. 10,000/- चे दंड वसूल करण्यात आले. मे.रेजिंटा हॉटेल यांनी जवळच्या नाल्यात हॉटेलचे अन्न टाकल्यामुळे रू.5,000/- चे दंड वसुल करण्यात आला.गांधीबाग झोन अंतर्गत मे.परमात्मा किराणा शॉप यांनी प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रु. 5,000/- चे दंड वसुल करण्यात आले. सतरंजीपुरा झोन अंतर्गत मे. अशोक किराणा शॉप  यांनी प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रु. 5,000/- चे दंड वसुल करण्यात आले.लकडगंज झोन अंतर्गत मे. लिव्हिलो होम्ज यांनी बांधकामाचे साहित्य रस्त्यालगत टाकल्याबद्दल रू.10,000/- रूपयाचे दंड वसुल करण्यात आले. मंगळवारी झोन अंतर्गत मे. सेव्हन हाईटस यांनी बांधकामाचे साहित्य रस्त्यालगत टाकल्याबद्दल रू.10,000/- रूपयाचे दंड वसुल करण्यात आले. उपद्रव शोध पथकाने 10 प्रकरणांची नोंद करून रू. 75,000/- दंड वसूल केला.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.