spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

घरफोडीचे ३ गुन्हे उघड, १ आरोपी अटक परशिवणी पोलीसांची कामगिरी

पारशिवणी :- पोलीस स्टेशन पारशिवणी अंतर्गत वेटरनरी दवाखाना, पारशिवणी येथे आत प्रवेश करून अज्ञात चोरट्यांनी चोरी (घरफोडी) केल्याबाबत गुन्हा नोंद आहे. दिनांक २५/११/२०२५ रोजी मौजा नायाकुंड येथे फिर्यादी सौ दर्शना उके यांच्या घरचे कुलुप तोडुन अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केली होती. तसेच दिनांक २५/११/२०२५ रोजी मौजा पालोरा येथे फिर्यादी घनश्याम पोटभरे यांचे घरी सुध्दा तोडुन अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून घरातील ऐवज चोरी केला होता. सदर प्रकरणी पारशिवणी पोलीस स्टेशन येथे घरफोडी च्या कलमान्वये गुन्हे नोंद आहे.

हर्ष ए. पोद्दार, पोलीस अधिक्षक, नागपुर ग्रामीण जिल्हा आणि अनिल म्हस्के, अपर पोलीस पोलीस अधिक्षक, नागपुर ग्रामीण यांच्या मार्गदर्शनात पारशिवणी पोलीसांनी गुप्तबातमीदारांच्या माहीतीच्या आणि तांत्रिक पुराव्यांच्या अधारे दिनांक १६/१२/२०२५ रोजी आरोपी नामे अजय रामदास पाल, वय २० वर्षे, रा. आंबेडकर नगर, मनसर, ता रामटेक यास मनसर येथुन ताब्यात घेवुन नमुद आरोपीकडे पोलीसांनी सखोल आणि कौशल्यपुर्ण विचारपुस केली असता त्याने त्याचा साथीदार विधीसंघर्षग्रस्त बालक याच्यासोबत वर नमुद तिन्ही ठिकाणी घरफोडी करून ऐवज चोरी केल्याबाबत कबुली दिली. पारशिवणी पोलीसांनी नमुद आरोपीस अटक करून नमुद आरोपीतांकडुन गुन्हयात चोरीस गेलाला मुद्देमाल रोख रक्कम ७,०००/- रूपये, सोन्याचे मणी आणि इतर चोरीस गेलेले साहीत्य एकुण १५,२००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

Popular Articles