नागपूर १४ : नागपूरमधून तीन व्यक्ती बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यांमध्ये दाखल करण्यात आली आहे. यात जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीतून भोला तरोडा हातपछेल (वय ६२) आणि सौ. रिना विवेक वाघाडे (वय २३) हे बेपत्ता झाले आहेत, तर कु. आदिती उर्फ जानु गुड्डु सोनवणे (वय १८) ही नवीन कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून बेपत्ता झाली आहे.
- भोला तरोडा हातपछेल १२ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ६ वाजेपासून बेपत्ता आहेत. त्यांचा रंग सावळा, उंची ५ फूट ५ इंच असून त्यांनी चौकडीचा शर्ट आणि सोनेरी रंगाची पॅन्ट घातली आहे.
- आदिती उर्फ जानु सोनवणे १० ऑगस्ट २०२५ रोजी रात्री ८ वाजल्यापासून बेपत्ता आहे. तिचा रंग सावळा, उंची ५ फूट असून तिने काळ्या रंगाचा टॉप व प्लाझो घातलेला आहे. तिच्या डाव्या हातावर गोंदलेले आहे.
- सौ. रिना वाघाडे ०८ जुलै २०२५ रोजी सकाळी ११ वाजेपासून बेपत्ता आहे. तिचा रंग सावळा, उंची ५ फूट असून तिने निळ्या रंगाचा सलवार सूट घातला आहे. तिच्या उजव्या हातावर ‘V’ असे गोंदलेले आहे.
पोलिसांनी या तिघांचा शोध सुरू केला असून, नागरिकांना त्यांच्याबद्दल काही माहिती मिळाल्यास जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.




