बुटीबोरी १४ : रक्षाबंधन सणानिमित्त १२ ऑगस्ट २०२५ रोजी गुरुकुल विद्यालय बोरी येथील शिक्षिका आणि विद्यार्थिनींनी बुटीबोरी पोलीस स्टेशनला भेट दिली. यावेळी त्यांनी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसोबत रक्षाबंधन साजरा केला.
या भेटीदरम्यान, पोलीस निरीक्षक प्रतापराव भोसले (प्रभारी अधिकारी, पोलीस स्टेशन बुटीबोरी), सहायक पोलीस निरीक्षक निलेश चवरे, सहायक पोलीस निरीक्षक अजितसिंग देवरे, पोलीस उपनिरीक्षक सचिन उरकुडे, पोलीस हवालदार कुणाल अरगुडे, पोलीस हवालदार प्रवीण देव्हारे आणि पोलीस शिपाई माधव गुट्टे यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.
यावेळी अधिकाऱ्यांनी सायबर क्राईम, अमली पदार्थांचे दुष्परिणाम, सोशल मीडियाचा योग्य वापर आणि पोक्सो कायद्याबाबत माहिती दिली. तसेच, त्यांना पोलीस स्टेशनच्या कामकाजाची प्राथमिक माहिती देऊन भेटवस्तूही देण्यात आल्या. या उपक्रमामुळे विद्यार्थिनींना पोलिसांच्या कार्याची जवळून माहिती मिळाली.




