नागपूर, ता. २ : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाद्वारे सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, 79 मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई केली जात आहे. शुक्रवार (ता.०१) रोजी शोध पथकाने ३९ प्रकरणांची नोंद करून ३६,३००/- रुपयाचा दंड वसूल केला. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. 400/- दंड) या अंतर्गत १७ प्रकरणांची नोंद करून ६,८00/- रुपयांची वसुली करण्यात आली. व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रु. १००/- दंड) या अंतर्गत ०१ प्रकरणांची नोंद करून १००/- रुपयांची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रू.400/-दंड) या अंतर्गत ०२ प्रकरणांची नोंद करून ८००/- रूपयांची वसुली करण्यात आली.मॉल, उपहारगृहे, लॉजिंग, बोर्डींग हॉटेल, सिनेमा हॉल, मंगल कार्यालय, कॅटरर्स सर्व्हिस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ता या अंतर्गत ०१ प्रकरणांची नोंद करून २,०००/-रुपयांची वसुली करण्यात आली.वाहतूकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत ११ प्रकरणांची नोंद करून १७,०००/- रुपयांची वसुली करण्यात आली. सार्वजनिक रस्ता,फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी जनावरे धुवून बांधणे या अंतर्गत ०१ प्रकरणाची नोंद करून रू.१,०००/- चे दंड वसुल करण्यात आले. सार्वजनिक रस्ता,फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी बांधकामाचा मलबा/टाकावू कचरा टाकणे/साठवणे या अंतर्गत ०१ प्रकरणाची नोंद करून रू.१,०००/- चे दंड वसुल करण्यात आले. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास १८ प्रकरणांची नोंद करून ३,६००/- दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास ०४ प्रकरणांची नोंद करून रु.४,००० /- चे दंड वसूल करण्यात आलेला आहे. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
तसेच उपद्रव शोध पथकाने धरमपेठ झोन अंतर्गत आशिष काळे यांनी अनधिकृत जागी मलबा टाकल्यामुळे रू.१०,०००/- चे दंड वसूल करण्यात आले. मे. पर्पल टरटल प्री स्कूल यांनी विनापरवानगी विद्युत खांबावर जाहिरातीचे फलक लावल्याने रु. ५,०००/- चे दंड वसुल करण्यात आले. मे. फोर्चुन इन्फ्रा यांनी बांधकामाचे साहित्य टाकल्यामुळे रू.१०,००० /- रूपयांची वसुली करण्यात आली. मे. याराना सेलिब्रेशन यांनी अनधिकृत जागी अन्नपदार्थ टाकल्यामुळे रू.5,000/-
चे दंड वसुल करण्यात आले. धंतोली झोन अंतर्गत मे.बी. एस.पब्लिक स्कुल यांनी विनापरवानगी विद्युत खांबावर जाहिरातीचे फलक लावल्याने रु. 5,000/- चे दंड वसुल करण्यात आले. नेहरूनगर झोन अंतर्गत मे. स्वामी डेंटल क्लिनीक यांनी बायोमेडिकल वेस्ट कचऱ्ऱ्यात टाकल्यामुळे रू.10,000/- चे दंड वसुल करण्यात आले. सतरंजीपुरा झोन अंतर्गत मे. जगदीप बेकरी यांनी प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रु. 5,000/- चे दंड वसुल करण्यात आले.
आशीनगर झोन अंतर्गत मे. श्रीनिवास इंडसट्रीज यांनी बांधकामाचे साहित्य टाकल्यामुळे रू.10,000/- रूपयांची वसुली करण्यात आली. मंगळवारी झोन अंतर्गत मे.चेलवानी ब्रदर्स यांनी बांधकामाचे साहित्य टाकल्यामुळे रू.10,000/- रूपयांची वसुली करण्यात आली. तसेच उपद्रव शोध पथकाने 09 प्रकरणांची नोंद करून रू. 70,000/- दंड वसूल केला.




