spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

‘एक तारीख, एक तास एक साथ’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

 

नागपूर, ता. २  : स्वच्छ, सुंदर नागपूर साकारण्यासाठी महिन्याच्या पहिल्याच दिवशी नागपूर महानगरपालिका व नागपूर स्मार्ट सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने व घनकचरा व्यवस्थापन विभागातर्फे राबविण्यात येत असलेल्या ‘एक तारीख, एक तास, एक साथ’ या अभिनव उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनात आणि अतिरिक्त आयुक्त  वसुमना पंत यांच्या नेतृत्वात दहाही झोनच्या सहाय्यक आयुक्त यांच्या मार्फत शुक्रवारी (ता.१) मनपाच्या दहाही झोनमध्ये आरोग्याच्या संदर्भात सहा मूलमंत्र यावर भर देणाऱ्या ‘सफाई अपनाओ, बिमारी भगाओ अभियान अंतर्गत ‘एक तारीख, एक तास, एक साथ’ उपक्रम राबविण्यात आला.

मनपाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त स्वचछता विभागामार्फत प्रत्येक झोनमध्ये स्वच्छता करण्यात आली. यात लक्ष्मीनगर झोनमधील प्रभाग क्रमांक ३८ मध्ये प्रगतीनगर,  धरमपेठ झोनमधील प्रभाग क्रमांक १४ मधील डब्ल्यूसीएल रोड, भारत नगर, राजभवन,  हनुमान नगर झोन  मधील प्रभाग क्रमांक ३२ मधील दुर्गानगर शाळा, धंतोली झोन मधील प्रभाग क्रमांक १७ मधील भुरा मैदान हाजरी स्टॅड, नेहरूनगर झोन मधील प्रभाग क्रमांक २८ मधील धनवंतरी नगर , गांधीबाग झोन मधील प्रभाग क्रमांक १८ मधील चंदनीपुरा, तरंजीपुरा झोन मधील प्रभाग क्रमांक २० मधील नाईक तलाव, महात्मा ज्योतीबा शाळेजवळ, लकडगंज झोन मधील प्रभाग क्रमांक ४  मधील भरतवाडा रोड, नेताजी नगर नागपूर स्कूलच्या जवळ, आशीनगर झोन मधील प्रभाग ७ मधील आवळे बाबू चौक, मंगळवारी झोन मधील प्रभाग १ मधील  मंगळवारी बाजार मध्ये स्वच्छता कर्मचाऱ्यांनी स्वच्छता केली.  यावेळी नागरिकांना पावसाळ्याच्या दृष्टीने विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले. याशिवाय नागरिकांना हाताची स्वच्छता राखणे, घराची स्वच्छता राखणे, परिसर स्वच्छ ठेवणे, शौचालयाची स्वच्छता राखणे, नाल्या व सांडपाण्याची जागा स्वच्छ ठेवणे, तसेच सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता राहणार नाही, याची काळजी घेण्याच्या संदर्भात जनजागृत करण्यात आले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.