spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

सांस्कृतिक-शैक्षणिक नगरी उमरेडात एमडी ड्रग्ससह 4 युवक जेरबंद

 

दीड महिन्याच्या गुप्त पाहणीवरून उमरेड पोलिसांची जिगरबाज कारवाई  

उमरेड  १४ : उमरेड शहरातील बायपास चौकात मंगळवार, 12 ऑगस्ट 2025 रोजी रात्री पोलिसांनी मोठी कारवाई करत 4 युवकांना 2.72 ग्रॅम एमडी (मेफेड्रॉन) ड्रग्ससह रंगेहात पकडले. ही कारवाई दीड महिन्याच्या गुप्त पाहणीनंतर करण्यात आली. पोलिसांना गुप्त सूत्रांकडून माहिती मिळाली होती की नागपूरवरून पांढऱ्या रंगाच्या महिंद्रा स्कॉर्पिओ (MH 30 AF 4179) वाहनातून काही युवक एमडी ड्रग्स घेऊन उमरेडकडे येत आहेत. या माहितीवरून उमरेड बायपास चौकात रात्री 8 वाजल्यापासून नाकाबंदी करण्यात आली आणि संशयित वाहन थांबवून पंचासमक्ष व फॉरेन्सिक पथकाच्या उपस्थितीत तपासणी करण्यात आली. वाहनातून 2.72 ग्रॅम एमडी ड्रग्स पावडर किंमत ₹12,000, लाल कॅप असलेल्या पांढऱ्या रंगाच्या 4 सीरम बाटल्या किंमत ₹80, चारचाकी महिंद्रा स्कॉर्पिओ किंमत ₹4,50,000 आणि चारही आरोपींचे मोबाईल फोन किंमत ₹46,000 असा एकूण ₹5,08,080 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जप्त केलेल्या अमली पदार्थाचे नमुने उच्च तपासणीसाठी नागपूरला पाठविण्यात आले आहेत. अटक आरोपींची नावे प्रज्वल लिलाधर माथने (21, रा. मेढा, भिवापूर), योगेश फुलचंद पवार (28, रा. नाळ शिवणफळ, भिवापूर), अद्वैत वसंता हेडाउ (32, रा. शिवनगर, उमरेड) आणि निखील अरुण कुहीकर (31, रा. परसोडी वाघमारे लेआउट, उमरेड) अशी आहेत. चौघांना 16 ऑगस्ट 2025 पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली असून प्राथमिक तपासात एमडी पावडर खरेदीचे धागेदोरे नागपूरच्या रेशीमबाग व हसनबाग परिसरात असल्याचे उघड झाले आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार, अप्पर पोलिस अधीक्षक अनिल म्हस्के, उपविभागीय पोलिस अधिकारी वृष्टी जैन यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि धनाजी जळक, पो.उप.नि. किरण महागावे, पो.उप.नि. माणिक गुट्टे, तसेच पोलीस अंमलदार राधेश्याम कांबळे, रमेश खरकाटे, पंकज बट्टे, चेतन माहुलकर, गोवर्धन शहारे आणि सचिन हटवार यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.