– उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई
नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाद्वारे सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, 79 मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई केली जात आहे. 27 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर दरम्यान शोध पथकाने 419 प्रकरणांची नोंद करून 2,47,200 रुपयाचा दंड वसूल केला.
सार्वजनिक ठिकाणी रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी थुंकणे या अंतर्गत 11 प्रकरणाची नोंद करून 5,500 रूपयाची वसुली करण्यात आली. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. 400 दंड) या अंतर्गत 221 प्रकरणांची नोंद करून 88,400 रुपयांची वसुली करण्यात आली. व्यक्तीने रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 9 प्रकरणाची नोंद करून 900 रूपयाची वसुली करण्यात आली.दुकानदाराने रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 31 प्रकरणाची नोंद करून 12,400 रूपयाची वसुली करण्यात आली. शैक्षणिक संस्था, कोचिंग क्लासेस, अशा संस्थांनी रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 2 प्रकरणांची नोंद करून 4,000 रूपयाची वसुली करण्यात आली. दवाखाने,इस्पितळे,पॅथलॅब इत्यादींनी रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 1 प्रकरणांची 2,000 रूपयाची वसुली करण्यात आली. मॉल,उपहारगृहे,लॉजिंग,बोर्डिंगचे हॉटेल,सिनेमाहॉल,मंगल कार्यालये,कॅटरर्स सर्व्हिस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 12 प्रकरणाची नोंद करून 24,000 रूपयाची वसुली करण्यात आली. सार्वजनिक ठिकाणी रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी जनावरे बांधणे या अंतर्गत 1 प्रकरणाची नोंद करून 2,000 रूपयाची वसुली करण्यात आली. रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी वाहने/जनावरे धुवून परिसर अस्वच्छ करणे या अंतर्गत 4 प्रकरणांची नोंद करून 4,000 रूपयाची वसुली करण्यात आले. चिकन सेंटर,मटन विक्रेता यांनी रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 9 प्रकरणांची नोंद करून 9,000 रूपयाची वसुली करण्यात आली. चिकन सेंटर,मटन विके्रता यांनी रस्ता,फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 9 प्रकरणाची नोंद करून 9,000 रुपयाची वसुली करण्यात आली. वर्कशॉप,गॅरेजेस व इतर दुरूस्तीचे व्यवसायिकाने रस्ता,फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी या अंतर्गत 16 प्रकरणाची नोंद करून 16,000 रूपयाची वसुली करण्यात आली. सार्वजनिक रस्ता,फुटपाथ, मोकळी जागा इत्यादी ठिकाणी बांधकामाचा मलबा/टाकावू कचरा टाकणे/साठवणे या अंतर्गत 5 प्रकरणाची नोंद करून 16,000 रूपयाची वसुली करण्यात आली. हॉटेल मध्ये डिसेलटिंग चेंबर, चोक झाल्यावर रस्त्यावर घाण पसरवणे व कचरा शुल्क न भरणे या अंतर्गत 8 प्रकरणाची नोंद करून रू.40,000 चे दंड वसुल करण्यात आले. शासकीय भुमीगत नाली वरील चेंबर मध्ये डेबरीज/साहित्य/कचरा टाकून अडथळा निर्माण करणे तसेच इतर बांधकाम करतांना चेंबर क्षतीग्रस्त करणे या अंतर्गत 1 प्रकरणाची नोंद करून 5,000 रूपयाची वसुली करण्यात आली. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास 88 प्रकरणांची नोंद करून 18,000 दंड वसूल करण्यात आलेला आहे. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
तसेच उपद्रव शोध पथकाने विनापरवागी विद्युत खांबावर फलक लावल्यामुळे 1 प्रकरणाची नोंद करून रू.5,000 दंड वसुल करण्यात आले. प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल 10 प्रकरणांतर्गत 50,000 चे दंड वसुल करण्यात आले. रस्त्यालगत बांधकामाचे साहित्य साठवल्यामुळे 6 प्रकरण अंतर्गत रू.60,000 चे दंड वसुल करण्यात आले. रस्त्यालगत सी अँड डी कचरा टाकल्यामुळे 4 प्रकरणांतर्गत रू.20,000 चे दंड वसुल करण्यात आले. जुनी इमारत पाडताना काळजी न घेतल्यामुळे 1 प्रकरणांतर्गत रू. 5,000 दंड वसुल करण्यात आले. हॉटेल मध्ये डिसेलटिंग चेंबर, चोक झाल्यावर रस्त्यावर घाण पसरवणे व कचरा शुल्क न भरणे 7 प्रकरण अंतर्गत रू. 35,000 चे दंड वसुल करण्यात आले. शासकीय भुमीगत नाली वरील चेंबर मध्ये डेबरीज/साहित्य/कचरा टाकून अडथळा निर्माण करणे तसेच इतर बांधकाम करतांना चेंबर क्षतीग्रस्त करणे 3 प्रकरण अंतर्गत रू. 15,000 दंड वसुल करण्यात आले. उपद्रव शोध पथकाने 32 प्रकरणांची नोंद करून रू.1,90,000 दंड वसुल केला.








