नागपूर, ता. २३ : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाद्वारे सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, 79 मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई केली जात आहे. मंगळवार (ता.22) रोजी शोध पथकाने 46 प्रकरणांची नोंद करून 29,500/- रुपयाचा दंड वसूल केला. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. 400/- दंड) या अंतर्गत 16 प्रकरणांची नोंद करून 6,400/- रुपयांची वसुली करण्यात आली. व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रु. १००/- दंड) या अंतर्गत 01 प्रकरणांची नोंद करून 100/- रुपयांची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रू.400/-दंड) या अंतर्गत 09 प्रकरणांची नोंद करून 3,600/- रूपयांची वसुली करण्यात आली.मॉल, उपहारगृहे, लॉजिंग, बोर्डींग हॉटेल, सिनेमा हॉल, मंगल कार्यालय, कॅटरर्स सर्व्हिस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ता या अंतर्गत 01 प्रकरणांची नोंद करून 2,000/-रुपयांची वसुली करण्यात आली.वाहतूकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 04 प्रकरणांची नोंद करून 8,000/- रुपयांची वसुली करण्यात आली. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास 27 प्रकरणांची नोंद करून 5,400/- दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास 04 प्रकरणांची नोंद करून रु.4,000/- चे दंड वसूल करण्यात आलेला आहे. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
तसेच उपद्रव शोध पथकाने लक्ष्मीनगर झोन अंतर्गत मे.आरोग्यम हॉस्पीटल यांच्यावर सी अँड डी कचरा टाकल्याबद्दल रू.5,000/- चे दंड वसुल करण्यात आले. धरमपेठ झोन अंतर्गत मे.के सी कंस्ट्रक्शन व मे.ए डी बिल्डर्स यांनी बांधकामाचे साहित्य रस्त्यालगत टाकल्याबद्दल प्रत्येकी रु. 10,000/-या प्रमाणे रू.20,000/- चे दंड वसूल करण्यात आले. गांधीबाग झोन अंतर्गत मे.श्याम किराणा शॉप यांनी प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रु. 5,000/- चे दंड वसुल करण्यात आले. सतरंजीपुरा झोन अंतर्गत मे. अग्रवाल नमकिन कारखाना यांनी प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रु. 5,000/- चे दंड वसुल करण्यात आले.आशीनगर झोन अंतर्गत मे. एच एस आईसक्रिम यांनी प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रु. 5,000/- चे दंड वसुल करण्यात आले. उपद्रव शोध पथकाने 06 प्रकरणांची नोंद करून रू. 40,000/- दंड वसूल केला.




