spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

विदर्भ ऑप्थॅल्मिक सोसायटी (व्हीओएस) चे ५० वे वार्षिक अधिवेशन – व्हीओएस गोल्डकॉन 2026

– ९ ते ११ जानेवारीला हॉटेल सेंटर पॉइंट नागपूरला

– VOS GOLDCON 2026 मध्ये नेत्ररोगशास्त्रातील नामवंत राष्ट्रीय तज्ज्ञांचा सहभाग

नागपूर :- विदर्भ नेत्ररोग संघटना (Vidarbha Ophthalmic Society VOS) आपली ५० वी वार्षिक परिषद -VOS GOLDCON 2026  दिनांक ९ ते ११ जानेवारी २०२६ दरम्यान हॉटेल सेंटर पॉईंट, नागपूर येथे आयोजित करीत आहे.

ही परिषद VOS च्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित करण्यात येत असून, नेत्ररोग शिक्षण व रुग्णसेवेमधील ५० वर्षांची गौरवशाली परंपरा साजरी करण्यात येणार आहे.

ही परिषद डॉ. विरल शाह (अध्यक्ष, VOS) यांच्या नेतृत्वाखाली आयोजित होत असून डॉ. शामिक मोकदम (सचिव), डॉ. संतोष दलंकर (कोषाध्यक्ष) आणि डॉ. राहुल तिवारी (वैज्ञानिक समिती अध्यक्ष) यांचे मोलाचे योगदान आहे.

VOS GOLDCON 2026 साठीच्या आयोजन समितीचे नेतृत्व डॉ. आशिष थूल (आयोजक अध्यक्ष), डॉ. राजेश जोशी (आयोजक सचिव) आणि डॉ.राजेंद्र विश्वकर्मा (आयोजक कोषाध्यक्ष) करीत आहेत.

या परिषदेला देशभरातील नामवंत नेत्ररोगतज्ज्ञांची उपस्थिती लाभणार असून त्यामध्ये प‌द्मश्री डॉ. टी. पी. लहाने, डॉ. नम्रता शर्मा, डॉ. रागिणी पारेख, डॉ. अनघा हिरूर, डॉ. जगदीप काकडिया, डॉ. संजय गद्रे, डॉ. प्रदीप मोहनता व डॉ. शैल वासवडा यांचा समावेश आहे. त्यांच्या सहभागामुळे परिषदेत होणाऱ्या शास्त्रीय चर्चाना विशेष उंची प्राप्त होणार आहे.

परिषदेच्या शास्त्रीय कार्यक्रमात मोतीबिंदू व रिफ्रक्टिव्ह शस्त्रक्रिया, कॉर्निया, ग्लॉकोमा (काचबिंदू), रेटिना, बाल नेत्ररोग, ऑक्युलोप्लास्टी तसेच सर्वसमावेशक नेत्ररोग या सर्व उपशाखांचा समावेश असेल.

“भूतकाळाचा सन्मान, भविष्याची घडण” या संकल्पनेवर आधारित ही परिषद विदर्भ, महाराष्ट्र तसेच देशभरातील नेत्ररोगतज्ज्ञांना एकत्र आणणारी एक महत्त्वपूर्ण शैक्षणिक व उत्सवी संधी ठरणार आहे.

नागपूर नेत्ररोग तज्ञ संघटनेच्या (Ophthalmological Society, Nagpur) यजमानत्वाखाली आयोजित होणारी VOS GOLDCON 2026 ही परिषद विदर्भ, महाराष्ट्र तसेच देशातील विविध भागांतील नेत्ररोग तज्ञांना आकर्षित करणार असून, नेत्रविज्ञान क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण शैक्षणिक व गौरवपूर्ण असा मैलाचा दगड ठरणार आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.