– महावितरण व तांत्रिक ॲप्रेंटिस कंत्राटी कामगार असोसिएशनचा पुढाकार
नरखेड :- महावितरण व तांत्रिक कामगार युनियन प्रणित तांत्रिक ॲप्रेंटिस कंत्राटी कामगार असोसिएशन च्यावतीने दि.०६ नोव्हेंबर रोजी रक्तदान शिबीर, इ एस आय सी नोंदणी अभियान, हेल्थ कॅम्प शिबिर व कामगार मेळावा आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमांचे उद्घाटक नागपूर ग्रामीण मंडळाचे अधिक्षक अभियंता संजय वाकडे यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी तांत्रिक कामगार युनियनचे सरचिटणीस प्रभाकर लहाने उपस्थितीत होते. प्रमुख अतिथी म्हणून महेश जाधव (सहाय्यक महाव्यवस्थापक) प्रकाश निकम (राज्य सचिव), पवन नंदरधने (उपकार्यकारी अभियंता) डॉ. अनुप अग्रवाल (वॉकडार्ट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल), संजय बारागवने (आयुष ब्लड सेंटर) सौरभ अवसरमोल, निलेश मेश्राम, संजय भागवत, रोहित मेश्राम, सौरभ नैताम, शुभम हेडाऊ, रितेश रामटेके प्रमुख उपस्थित होते. यावेळी उद्घाटकी मनोगत व्यक्त करतांना अधीक्षक अभियंता संजय वाकडे यांनी महावितरण मधील महत्वाचा घटक तांत्रिक कामगार व कंत्राटी कामगार हाच खरा मानबिंदू आहे. त्याची सुरक्षा,त्यांचे प्रलंबित असलेले प्रश्न यासाठी प्रशासन सकारात्मक काम करेल तसेच तांत्रिक कामगारांनी अपघात विरहित काम करावे. यावेळी महेश जाधव, प्रकाश निकम, संजय बारागवने मनोगत व्यक्त केले. यावेळी अध्यक्ष मनोगत व्यक्त करताना तांत्रिक कामगार युनियनचे प्रभाकर लहाने यांनी तांत्रिक कामगार युनियनचे कार्य हे कंपनीच्या व तांत्रिक कामगारांच्या हिता करता आहे कार्यक्रमाचे संचालन प्रकाश निकम यांनी केले व आभार नितेश घुसे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी योगेश धांडे, कुणाल जिचकार, मंगेश चिमोटे, निलेश चक्रपाणी , गणेश बडगे, सुनिल खडसकर, शुभम पंचभाई ,माधव चकोर, आकाश गुप्ता, पवन सौदागर, रवि सरोदे, शुभम भोयर , अमोल कावळे, सुरज ढोके , सुधाकर काकडे,पराग रेवतकर आदीने प्रयत्न केले.




