नागपूर, ता. १७ : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाद्वारे सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, 79 मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई केली जात आहे. बुधवार (ता.१६) रोजी शोध पथकाने ५२ प्रकरणांची नोंद करून ५८,००० रुपयाचा दंड वसूल केला.
हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. ४०० /- दंड) या अंतर्गत २० प्रकरणांची नोंद करून ८,००० रुपयांची वसुली करण्यात आली. व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रु. १००/- दंड) या अंतर्गत ०३ प्रकरणांची नोंद करून ३०० रुपयांची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रू.४००/-दंड) या अंतर्गत ०६ प्रकरणांची नोंद करून २,४०० रूपयांची वसुली करण्यात आली.
मॉल, उपहारगृहे, लॉजिंग, बोर्डींग हॉटेल, सिनेमा हॉल, मंगल कार्यालय, कॅटरर्स सर्व्हिस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ता या अंतर्गत ०२ प्रकरणांची नोंद करून ४,००० रुपयांची वसुली करण्यात आली. वाहतूकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत ०९ प्रकरणांची नोंद करून ३०,५०० रुपयांची वसुली करण्यात आली. सार्वजनिक ठिकाणी रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा, अशा ठिकाणी जनावरे बांधणे(रू.१,०००/- दंड) या अंतर्गत १ प्रकरणाची नोंद करून १,००० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. सार्वजनिक रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी बांधकामाचा मलबा/टाकावू कचरा टाकणे/साठवणे या अंतर्गत ०२ प्रकरणाची नोंद करून रू.२,००० रुपयांचे दंड वसुल करण्यात आले. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास २४ प्रकरणांची नोंद करून ४,८०० दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास ०५ प्रकरणांची नोंद करून रु.५,००० रुपयांचे दंड वसूल करण्यात आलेला आहे. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
तसेच उपद्रव शोध पथकाने लक्ष्मीनगर झोन अंतर्गत येणाऱ्या पुखराज इन्फ्राटेक प्रा.लि. यांच्यावर रस्त्यावर अस्वच्छता केल्या प्रकरणी रु. १०,००० रुपयांचे दंड वसूल करण्यात आले. तर धरमपेठ झोन अंतर्गत येणाऱ्या लवकुश त्रिपाठी यांच्यावर रस्त्यावर अस्वच्छता केल्या प्रकरणी २५,००० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. हनुमान नगर झोन अंतर्गत संजय तायडे यांच्यावर प्रतिबंधात्मक प्लास्टिक बाळगल्याप्रकरणी ५,००० रुपयांचे दंड वसूल करण्यात आले. धंतोली झोन अंतर्गत येणाऱ्या हॉटेल श्रीधर सर्व्हिस अपार्टमेंट आणि हॉटेल लोटस इन यांच्यावर विद्युत खांबांवर अनधिकृत जाहिरात फलक लावल्याप्रकरणी प्रत्येकी ५,००० असे एकूण १०,००० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
गांधीबाग झोन अंतर्गत येणाऱ्या मे. अजय किरणा स्टोअर आणि सातपुते किराणा स्टोअर यांच्यावर प्रतिबंधात्मक प्लास्टिक बाळगल्याप्रकरणी प्रत्येकी ५,००० असे एकूण १०,००० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. सतरंजीपुरा झोन अंतर्गत साई आशीर्वाद स्वीट यांच्यावर यांच्यावर प्रतिबंधात्मक प्लास्टिक बाळगल्याप्रकरणी रू ५,०००चा दंड वसूल करण्यात आले. लकडगंज झोन अंतर्गत शांती क्लिनिक यांच्यावर कचऱ्यात बायो मेडिकल वेस्ट टाकल्याप्रकरणी रू.१५,००० चा दंड वसूल करण्यात आला. आशीनगर झोन अंतर्गत सचिन किराणा स्टोअर यांच्यावर प्रतिबंधात्मक प्लास्टिक बाळगल्याप्रकरणी ५००० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तर मंगळवारी झोन अंतर्गत येणाऱ्या true वैल्यू प्रोजेक्ट यांच्यावर रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविल्या प्रकरणी १०,००० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. उपद्रव शोध पथकाने ११ प्रकरणांची नोंद करून रू. ९५,००० दंड वसूल केला.



