Related Posts

राज्यात ६०४ आपला दवाखाने सुरू; उर्वरित ९६ दवाखाने जानेवारी अखेर सुरू होणार – सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

<p><strong>नागपूर &colon;-<&sol;strong> हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखानाच्या माध्यमातून सर्व सामान्य माणसाला आरोग्याच्या सर्व सुविधा तत्काळ उपलब्ध होण्याच्या दृष्टीने ही योजना अधिक व्यापकपणे राबविण्यात येईल&period; राज्यात सध्या या योजनेंतर्गत ६०४ आपला दवाखाने सुरू असून उर्वरित ९६ दवाखाने येत्या जानेवारी अखेर सुरू करण्यात येतील&comma; अशी माहिती सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधान परिषदेत दिली&period;<&sol;p>&NewLine;<p>हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना व आरोग्य वर्धिनी केंद्र राज्यात पूर्ण क्षमतेने सुरू करण्याबाबत सदस्य प्रवीण दरेकर यांनी विधान परिषदेत प्रश्न उपस्थित केला होता&period; या प्रश्नाच्या चर्चेत सदस्य सर्वश्री अभिजीत वंजारी&comma; सचिन अहिर&comma; प्रसाद लाड&comma; परिणय फुके&comma; निरंजन डावखरे&comma; रणजितसिंह मोहिते&comma; राजहंस सिंह&comma; शशिकांत शिंदे&comma; उमा खापरे&comma; मनीषा कायंदे यांनी सहभाग घेतला&period;<&sol;p>&NewLine;<p>सर्वसामान्य व गरीब नागरिकांसाठी असल्याने ती अधिक प्रभावी आणि गतिमान करण्यासाठी आवश्यक ते सर्व उपाय करण्याचा शासनाचा निर्धार असल्याचे मंत्री प्रकाश आबिटकर यांनी स्पष्ट केले&period;<&sol;p>&NewLine;<p>मंत्री आबिटकर म्हणाले&comma; राज्य शासनामार्फत ७०० हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना व केंद्र शासनाच्या १५ वित्त आयोगाच्या निधीतून २&comma;२३२ नागरी आरोग्य वर्धिनी केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला&period; यापैकी ६०४ हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना व १&comma;६४३ नागरी आरोग्य वर्धिनी केंद्र सुरू करण्यात आली आहेत&period;<&sol;p>&NewLine;<p>आरोग्य मंत्री आबिटकर म्हणाले&comma; राज्यात सुरू असलेल्या हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना व नागरी आरोग्य वर्धिनी केंद्राची संबंधित जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्यामार्फत देखरेख केली जात आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना मध्ये फार्मसिस्ट नियुक्तीबाबत केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविण्यात आला असल्याचे सांगून मंत्री आबिटकर म्हणाले&comma; हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना व नागरी आरोग्य वर्धिनी केंद्राच्या प्रभावी कामकाजासाठी सर्व संबधित सदस्यांसमवेत बैठक घेतली जाईल&period;<&sol;p>&NewLine;