सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्या 62 प्रकरणांची नोंद

0
102

– उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई 

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाद्वारे सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, 79 मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई केली जात आहे. मंगळवार(ता.16) रोजी शोध पथकाने 62 प्रकरणांची नोंद करून 43,300/- रुपयाचा दंड वसूल केला. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. 400/- दंड) या अंतर्गत 10 प्रकरणांची नोंद करून 4,000/- रुपयांची वसुली करण्यात आली.दुकानदाराने रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रू.400/-दंड) या अंतर्गत 3 प्रकरणांची नोंद करून 1,200/- रूपयांची वसुली करण्यात आली.वाहतूकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 13 प्रकरणांची नोंद करून 16,500/- रुपयांची वसुली करण्यात आली.वर्कशॉप,गॅरेजेस व इतर दुरूस्तीचे व्यवसायीकांने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 4 प्रकरणाची नोंद करून रू.4,000/- चे दंड वसुल करण्यात आले. सार्वजनिक रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी बांधकामाचा मलबा/टाकावू कचरा टाकणे/साठवणे या अंतर्गत 1 प्रकरणाची नोंद करून रू.5,000/- चे दंड वसुल करण्यात आले. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास 23 प्रकरणांची नोंद करून 4,600/- दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास 8 प्रकरणांची नोंद करून रु.8,000/- चे दंड वसूल करण्यात आलेला आहे. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

तसेच उपद्रव शोध लक्ष्मीनगर झोन अंतर्गत मे.ऑरेंज सिटी वेंक्टयुरन आणि मे. भारत रेसिडेंसी यांनी बांधकामाचे साहित्य रस्त्यालगत टाकल्याबद्दल रु. 10,000 दंड वसूली करण्यात आली.

धरमपेठ झोन अंतर्गत मे. वेडिंग वर्ल्ड एक्झिबीशन यांनी विनापरवानगी विद्युत खांबांवर जाहिरातीचे बॅनर लावल्याप्रकरणी रू. 10,000/- /-चे दंड वसुल करण्यात आले.तसेच मे. भारत रेसिडेंसी यांनी बांधकामाचे साहित्य रस्त्यालगत टाकल्याबद्दल रु. 10,000 दंड वसूली करण्यात आली. हनुमाननगर झोन अंतर्गत मे.वेंकटेश डेव्लपर्स यांनी बांधकामाचे साहित्य रस्त्यालगत टाकल्याबद्दल रु. 10,000/-दंड वसुल करण्यात आले.धंतोली झोन अंतर्गत यांनी मे.सादीक अँड कंपनी यांनी रस्त्यावर बांधकामाचे चिखल व माती पसविल्यामुळे रू.10,000/-चे दंड वसुल करण्यात आले.तसेच मे.साईट द्रवीण-9 यांनी सी अँड डी कचरा रस्त्यालगत रू.5,000/- दंड वसुल करण्यात आले.गांधीबाग झोन अंतर्गत मे. पालवानी ट्रेडर्स यांनी प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रु. 5,000/- चे दंड वसुल करण्यात आले.सतरंजीपुरा झोन अंतर्गत मे.नायडु स्वीटस यांनी प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रु. 5,000/- चे दंड वसुल करण्यात आले. आशीनगर झोन अंतर्गत मे.जगत लॉन यांनी सिवरेज लाईन जोडल्याने चेंबर ओव्हरफ्लो झाल्यामुळे रू.5,000/-दंड वसुल करण्यात आले. मंगळवारी झोन अंतर्गत मे. वेडिंग वर्ल्ड एक्झिबीशन व मे.थ्रेडस ऑफ ट्रेडिशन्स यांनी विनापरवानगी विद्युत खांबांवर जाहिरातीचे बॅनर लावल्याप्रकरणी प्रत्येकी रू. 5,000/-या प्रमाणे रू.10,000 /-चे दंड वसुल करण्यात आले.उपद्रव शोध पथकाने 11 प्रकरणांची नोंद करून रू.80,000/- दंड वसूल केला.