– उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई
नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाद्वारे सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, 79 मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई केली जात आहे. गुरूवार(ता.18) शोध पथकाने 73 प्रकरणांची नोंद करून 41,000 रुपयाचा दंड वसूल केला. सार्वजनिक ठिकाणी रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी थुंकणे या अंतर्गत 2 प्रकरणाची नोंद करून 1,000 रूपयांची वसुली करण्यात आली.हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. 400 दंड) या अंतर्गत 31 प्रकरणांची नोंद करून 12,400 रुपयांची वसुली करण्यात आली.व्यक्तीने रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 2 प्रकरणाची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रू.400 दंड) या अंतर्गत 5 प्रकरणाची नोंद करून 2,000 रूपयांची वसुली करण्यात आली.वाहतूकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 15 प्रकरणांची नोंद करून 20,000 रुपयांची वसुली करण्यात आली.सार्वजनिक रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणेबांधकामाचा मलबा/टाकावू कचरा टाकणे /साठवणे या अंतर्गत 1 प्रकरणाची नोंद करून 2,000 रूपयाची वसुली करण्यात आली.उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास 17 प्रकरणांची नोंद करून 3,400 दंड वसूल करण्यात आलेला आहे. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

तसेच उपद्रव शोध पथकाने धरमपेठ झोन अंतर्गत मे. मधु प्रथा कंस्ट्रक्शन यांनी रस्त्यालगत बांधकामाचे साहित्य टाकल्यामुळे रू. 10,000 चे दंड वसुल करण्यात आले. तसेच मे. असली कॉफी बीन बॉक्स यांनी रस्त्यालगत दुकानाचा कचरा टाकल्यामुळे रू.5,000 दंड वसुल करण्यात आले. धंतोली झोन अंतर्गत मे. शुभ स्वप्न रेखराज ग्रॅब रेसिडेंशियल स्कीम यांनी रस्त्यालगत बांधकामाचे साहित्य टाकल्यामुळे रू. 10,000 चे दंड वसुल करण्यात आले. नेहरूनगर झोन अंतर्गत मे. गोस्वामी डेअरी यांनी रस्त्यालगत दुकानाचा कचरा टाकल्यामुळे रू. 5,000 दंड वसुल करण्यात आले. तसेच सागर चौधरी यांनी रस्त्यालगत सी अँड डी कचरा टाकल्यामुळे रू. 5,000 दंड वसुल करण्यात आले. सतरंजीपुरा झोन अंतर्गत मे. ताज स्वीटस यांनी प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रू. 5,000 दंड वसूल करण्यात आले. लकडगंज झोन अंतर्गत मे.ॲक्सीस लायब्ररी यांनी विनापरवानगी विद्युत खांबावर फलक लावल्याने रू. 5,000 दंड वसूल करण्यात आले. मंगळवारी झोन अंतर्गत मे. के.के.आर कंस्ट्रक्शन यांनी रस्त्यालगत बांधकामाचे साहित्य टाकल्यामुळे रू. 10,000 चे दंड वसुल करण्यात आले. उपद्रव शोध पथकाने 8 प्रकरणांची नोंद करून रू.55,000 दंड वसुल केला.




