spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

राजकीय पक्षांनी निवडणूक आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे

– मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांचे आवाहन

– ना हरकत प्रमाणपत्रांसाठी मनपा मुख्यालयात एक खिडकी व्यवस्था

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकी दरम्यान सर्व राजकीय पक्षांनी राज्य निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या आदर्श निवडणूक आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले.

निवडणूक आचारसंहितेच्या संदर्भात शहरातील राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. यावेळी मुख्य वित्त व लेखा अधिकारी सदाशिव शेळके, उपायुक्त निर्भय जैन , उपायुक्त मिलिंद मेश्राम, सहाय्यक आयुक्त श्याम कापसे प्रामुख्याने उपस्थित होते.

निवडणुकीसाठी उमेदवारांना अडचण जाणार नाही, याची काळजी घेतली जात असून, सर्व झोन कार्यालयांमध्ये निवडणूक अधिकारी राहणार आहेत. तसेच उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांना आवश्यक ना हरकत पत्रे घेणे सोईचे व्हावे, यासाठी महानगरपालिकेच्या मुख्यालयात एक खिडकी व्यवस्था कार्यान्वित केली आहे. झोन स्तरावरील आवश्यक कागदपत्रे व परवानग्या झोन कार्यालयातूनच दिल्या जाणार आहेत.

उमेदवारी अर्ज ऑफलाईन पद्धतीने

निवडणुकीसाठी उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज दाखल करावे लागणार आहे. उमेदवारांसाठी खर्चाची मर्यादा 15 लाख रुपये एवढी आहे. असे ही आयुक्त डॉ. चौधरी यांनी सांगितले.

जाहिरातीसाठी पूर्वपरवानगी आवश्यक

वर्तमानपत्रे, चॅनेल किंवा सोशल मिडीयावर उमेदवार किंवा राजकीय पक्षांना जाहिरात करण्यासाठी माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समितीची (एमसीएमसी) पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे. या माध्यमातून उमेदवार किंवा राजकीय पक्षांनी जातीय तेढ निर्माण होईल किंवा सामाजिक सौहार्द बिघडविणारा मजकूर, छायाचित्रे किंवा चित्रफित पोस्ट करू नये, असेही आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी स्पष्ट केले.

Popular Articles