Home Latest News सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्या 86 प्रकरणांची नोंद

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्या 86 प्रकरणांची नोंद

0
58

– उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई 

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाद्वारे सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, 79 मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई केली जात आहे. शुक्रवार (ता. 19) रोजी शोध पथकाने 86 प्रकरणांची नोंद करून 37,400 रुपयाचा दंड वसूल केला. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. 400/- दंड) या अंतर्गत 33 प्रकरणांची नोंद करून 13,200 रुपयांची वसुली करण्यात आली. व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे(रू.१००/-दंड)या अंतर्गत ०२ प्रकरणांची नोंद करून २०० रुपयांची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रु. 400/- दंड) या अंतर्गत 5 प्रकरणांची नोंद करून रू. 2,000 चे दंड वसुली करण्यात आली.वाहतूकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 12 प्रकरणांची नोंद करून 12,000 रुपयांची वसुली करण्यात आली. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास 30 प्रकरणांची नोंद करून 6,000/- दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास 4 प्रकरणांची नोंद करून रु. 4,000 चे दंड वसूल करण्यात आलेला आहे.ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

तसेच उपद्रव शोध पथकाने लक्ष्मीनगर झोन अंतर्गत मे. एल.के.कंस्ट्रक्शन यांनी बांधकामाचे साहित्य रस्त्यालगत टाकल्याबद्दल रु. 10,000 चे दंड वसूल करण्यात आले.धरमपेठ झोन अंतर्गत मे.हायटेक इन्फ्रास्ट्रक्चर्स यांनी बांधकामाचे साहित्य रस्त्यालगत टाकल्याबद्दल रु. 5,000 चे दंड वसूल करण्यात आले. धंतोली झोन अंतर्गत दुर्गेश मेहर यांनी सी अँड डी कचरा रस्त्यालगत टाकल्यामुळे रू.5,000 चे दंड वसुल करण्यात आले.गांधीबाग झोन अंतर्गत मे. जांभुळकर किराणा स्टोअर्स यांनी प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रु. 5,000 चे दंड वसूल करण्यात आले. सतरंजीपुरा झोन अंतर्गत मे. शिव स्क्रॅप यांनी बांधकामाचे स्क्रॅप साहित्य रस्त्यालगत टाकल्याबद्दल रू.5,000 दंड वसुल करण्यात आले.मंगळवारी झोन अंतर्गत मे.सुनील धामणे यांनी बांधकामाचे साहित्य रस्त्यालगत टाकल्याने रू.5,000 चे दंड वसुल करण्यात आले.श्रीराम देशकर यांनी बोरवेलचा चिखल रस्त्यावर पसरविल्यामुळे रू.5,000दंड वसुल करण्यात आले.मधुर बागचंदानी यांनी रू.5,000चे दंड वसुल करण्यात आले. उपद्रव शोध पथकाने 8 प्रकरणांची नोंद करून रू. 45,000 दंड वसूल केला.