– उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई
नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाद्वारे सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, 79 मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई केली जात आहे.रविवार आणि सोमवार (ता.5आणि 6) रोजी शोध पथकाने 88 प्रकरणांची नोंद करून 42,900 रुपयाचा दंड वसूल केला. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. 400/- दंड) या अंतर्गत 20 प्रकरणांची नोंद करून 8,000 रुपयांची वसुली करण्यात आली. व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रु. 100/- दंड) या अंतर्गत 2 प्रकरणांची नोंद करून रू.200 चे दंड वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रु. 400/- दंड) या अंतर्गत 11 प्रकरणांची नोंद करून रू.4,400 चे दंड वसुली करण्यात आली.मॉल,उपहारगृहे,लॉजिंग,बोर्डिंगचे हॉटेल,सिनेमा हॉल,मंगल कार्यालये,कॅटरर्स सर्व्हिस प्रोव्हायडर इत्यादी कारणांनी रस्ता,फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 2 प्रकरणाची नोंद करून रू.4,000 रूपयाची वसुली करण्यात आली.

वाहतूकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 6 प्रकरणांची नोंद करून6,500 रुपयांची वसुली करण्यात आली. चिकन सेंटर,मटन विक्रेता यांनी त्यांचा कचरा रस्ता,मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 1 प्रकरणाची नोंद करून रू.1,000 रुपयाची वसुली करण्यात आली. सार्वजनिक रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा इत्यादी ठिकाणी कचरा टाकणे/साठवणे या अंतर्गत १ प्रकरणांची नोंद करून5,000 रुपयांची वसुली करण्यात आली. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास 39 प्रकरणांची नोंद करून 7,800 रुपयाचा दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास 6 प्रकरणांची नोंद करून रु. 6,000 चे दंड वसूल करण्यात आलेला आहे. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
तसेच उपद्रव शोध पथकाने पथकाने लक्ष्मीनगर झोन अंतर्गत मे.भूमी अपार्टमेंट यांनी बांधकामाचे साहित्य रस्त्यालगत टाकल्याने रू.10,000 दंड वसुल करण्यात आले. तसेच सुरेंद्र महाकाळकर यांनी सी अँड डी कचरा रस्त्यालगत टाकल्यामुळे रू.5,000 चे दंड वसुल करण्यात आले. हनुमाननगर झोन अंतर्गत मे.शिवानी जनरल अँड डेली निड्स यांनी प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रु. 5,000 चे दंड वसूल करण्यात आले. धंतोली झोन अंतर्गत ओम अग्रवाल यांनी प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रु. 5,000 चे दंड वसूल करण्यात आले. गांधीबाग झोन अंतर्गत मे. तकदीर स्वीटस यांनी प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रु. 5,000 चे दंड वसूल करण्यात आले. सतरंजीपुरा झोन अंतर्गत मे. स्पेशल सोनपापडी यांनी प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रु. 5,000 चे दंड वसूल करण्यात आले. लकडगंज झोन अंतर्गत सुनील तुलीया यांनी सी अँड डी कचरा रस्त्यालगत टाकल्यामुळे रू.5,000 चे दंड वसुल करण्यात आले. मंगळवारी झोन अंतर्गत मे. द मेटगाला, लक्झरी डिझायनर अँड लाईफस्टाईल एक्झीबीशन यांनी विनापरवानगी विद्युत खांबावर जाहिरातीचे फलक लावल्याने रू. 5,000 दंड वसुल करण्यात आले.उपद्रव शोध पथकाने 8 प्रकरणांची नोंद करून रू.45,000 दंड वसूल केला.




