spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

नागपूर विधानपरिषद निवडणुकीसाठी कामठी तालुक्यात 99.29 टक्के मतदान

– २२ जून रोजी मतमोजणी

कामठी :- महाराष्ट्र विधानपरिषद स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक-2026 अंतर्गत नागपूर विधानपरिषद निवडणुकीसाठी आज (दि. १८) कामठी तहसील कार्यालयातील मतदान केंद्रावर सकाळी ८ ते सायंकाळी ४ वाजेदरम्यान मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. या निवडणुकीत कामठी तालुक्यातील एकूण १४० मतदारांपैकी १३९ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे तालुक्यात ९९.२९ टक्के इतके विक्रमी मतदान झाले. तर कामठी नगर परिषदेच्या एका नगरसेवकाने मतदान प्रक्रियेत अनुपस्थिती दर्शविली.

या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार डॉ. राजीव पोद्दार आणि महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार अतुल लोंढे यांच्यात थेट लढत होत आहे. या दुहेरी लढतीत विजयाची बाजी कोण मारणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असून याचा निकाल २२ जून रोजी होणाऱ्या मतमोजणीतून स्पष्ट होणार आहे.

या निवडणुकीत कामठी नगर परिषद, येरखेडा नगर पंचायत, महादुला नगर पंचायत, बिडगाव, तरोडी, पांढुर्णा, गोधणी आणि बहादुरा नगर पंचायत तसेच कामठी छावणी परिषदेचे नगरसेवक, नगरसेविका, नगराध्यक्ष आणि मनोनीत सदस्य अशा एकूण १४० मतदारांचा समावेश होता. मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मतपेट्या नागपूर येथील जिल्हा सुरक्षा कक्षात सुरक्षित ठेवण्यात आल्या.

ही संपूर्ण मतदान प्रक्रिया मतदान केंद्राध्यक्ष तथा तहसीलदार गणेश जगदाडे यांच्या मार्गदर्शनाखाली शांततापूर्ण आणि यशस्वीरीत्या पार पडली.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.