कामठी 1 : दरवर्षी प्रमाणे याही वर्षी कामठी तालुक्यातील आजनी गावात रविवार दिनांक ३१ ऑगस्ट २०२५ रोजी गावातील सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन श्रीची इच्छा समितीच्या दिंडीमधील सर्व भाविकांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिरात ३७ दात्यांनी रक्तदान करून आपली सामाजिक बांधिलकी जोपासली. संकलन नागपूर येथील तिरपुडे रक्तपेढीच्या अनुभवी अधिकाऱ्यांनी केले. यावेळी सर्वाधिक रक्तदान करणारे निखिल देवसरकार आणि सामाजिक कार्यकर्ते दत्ता भाऊ शिर्के यांचा सत्कार करण्यात आला. तर जीवन तरंग बहुउद्देशीय सेवा संस्थेच्या वतीने आयोजकांचा सत्कार करण्यात आला.
आजनी गावातील सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने सलग आयोजित रक्तदान शिबिराचे हे ११ वे वर्ष आहे. वर्षभर कुणा गरजवंताला लागलेल्या रक्ताची पूर्तता कार्यकर्त्यांच्या माध्यमातून केली जाते.
या शिबिरासाठी नवयुवक युवा मंडळाने पुढाकार घेतला तर वीर बजरंग क्रीडा मंडळ, जय बजरंग क्रीडा व, सावित्रीबाई ज्योतीराव फुले निःशुल्क अभ्यासिका आणि वाचनालयाच्या कार्यकर्त्यांनी यात आपला सहयोग दिला