37 रक्तदात्यांनी केले स्वेच्छेने रक्तदान

0
63

कामठी 1:- कामठी चे राजाधिराज 2025 चा गणेशोत्सव निमित्त शिवाजी नगर,हरदास नगर कामठी येथील नवयुवक श्री हरदुलाल बाबा गणेशोत्सव मंडळ बजरंग पार्क कामठी च्या वतीने प्रथमता  आयोजित  रक्तदान शिबिरात 37 रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान केले.या रक्तदान शिबिराला लाईफ लाईन ब्लड बॅंक च्या चमूने विशेष आरोग्य रक्तसंकलंन सेवा  पुरविली.
या रक्तदान शिबिराच्या यशस्वीतेसाठी  नवयुवक श्री ह्ररदुलाल गणेशोत्सव मंडळ कामठी चे अध्यक्ष राजू  तुप्पट,कार्याध्यक्ष चंद्रशेखर गोपाल तुप्पट,नरेश रेवतकर ,गणेश लोंदासे यासह मंडळाच्या समस्त पदाधिकारी व सदस्यसह भक्तगनांनी  मोलाची भूमिका साकारली