नागपूर ५ : आदिवासी समाजातील पहिली ते चौथी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना नामांकित इंग्रजी माध्यमांच्या शाळेत निशुल्क प्रवेश मिळण्या संदर्भात शासनाने विलंब केल्याने 29 ऑगस्ट 2025 रोजी बहुजन समाज पार्टी च्या नेत्यांनी, आदिवासी समाजातील विविध संस्था, संघटनांनी आदिवासी आयुक्तालयात ठिय्या आंदोलन केले होते. त्या आंदोलनाने चिडून त्याच दिवशी आदिवासी विभागातर्फे बालकांना प्रवेश नाकारणारा काळा जीआर काढण्यात आला.
या काळया जीआर च्या विरोधात बहुजन समाज पार्टीने व आदिवासी समाजातील अनेक संघटनांनी रस्त्यावर उतरण्याची धमकी दिली. त्यासाठी 4 सप्टेंबर रोजी बसपा नेते उत्तम शेवडे यांच्या नेतृत्वात एका शिष्टमंडळाने आदिवासी विकास विभागाच्या नागपुरातील अप्पर आयुक्त आयुषी सिंह यांची भेट घेतली. तो काळा जीआर रद्द करून 228 पात्र बालकांना न्याय देण्यासाठी नवीन जीआर काढण्याची एका शिष्टमंडळाद्वारे विनंती केली.
4 सप्टेंबर रोजी सायंकाळी महाराष्ट्र शासनाने नवीन जीआर काढून त्या सर्व 228 पात्र असलेल्या बालकांना नामांकित शाळेत प्रवेश देण्याचा निर्णय घेतला. त्या निर्णयाचे बसपाने अभिनंदन केले.
आजच्या शिष्टमंडळात महाराष्ट्र प्रदेश बसपाचे मीडिया प्रभारी उत्तम शेवडे, नागपूर जिल्हा महासचिव चंद्रशेखर कांबळे, जिल्हा सचिव अभिलेश वाहाने, आदिवासी नेते एड वीरेश वरखडे, रोहित इलपाची, चिमूर चे प्रा रामराव ननावरे, दादाजी टेकाम, राजकुमार मसराम, अंकित थूल निखिल बोंबार्डे प्रामुख्याने उपस्थित होते.

