रमाई नगरात दिव्यांगाच्या घरात निघाला विषारी नाग

0
144

कामठी १० : येथील रमाई नगर प्रेस के बालाजी मंदीर रोड निवासी परमानंद मेश्राम या दिव्यांगा च्या घरी आज पहाटे 6 वाजता दरम्यान  विषारी नाग निघाल्या ने खळबळ उडाली. विषारी नागा ला  सर्पमित्रा ने पकडून नैसर्गीक अधिवासात सुरक्षित सोडून दिले. दिव्यांग परमानंद मेश्राम यांचे घर रेल्वे लाइन जवळ असून नुकतीच रेल्वे विभाग द्वारा घरा मागे पानी निकासी हेतु नाली बनविण्यात आली. ही नाली चमार नाला पर्यंत बनवायची होती, परंतु ठेकेदार अपूर्ण नाली बनवून निघून गेला. ओल असल्यामुळे अपूर्ण नालीतुन नेहमीच साप, नाग, विंचू आणि इतर विषारी जीव जंतु निघत असतात.
ही अपूर्ण नाली चमार नाला पर्यन्त बनविण्याची मागणी माजी भाजपा नगरसेविका संध्या रायबोले, भाजपा पदाधिकारी विक्की बोंबले, अरविंद चवड़े, उमेश जगणे, शंकर चवरे, दिनेश खेडकर, रोहित दहाट,निलम रामटेके, सुनिल वक्कलकर, मुकेश बाराहाते,अतुल सोनटक्के,शालू बोरकर, हेमलता वक्कलकर,पूजा शाहू यांनी रेल्वे विभागाला केली आहे.