Home Latest News भिलगावात निघाली भव्य धम्म रॅली

भिलगावात निघाली भव्य धम्म रॅली

0
121

 कामठी १० :  भिलगावात उत्साहपूर्ण वातावरणात भव्य धम्म रॅलीचे आयोजन करण्यात आले. सकाळी ९ वाजता नागलोक येथे बुद्ध वंदना घेऊन रॅलीला प्रारंभ झाला. रॅलीने बुद्ध नगरी, लोकविहार पार्क, हम लोग कॉलनी, सानिका विहार, राम वाटिका, अग्रसेन नगर, तिवारी नगर, सप्तगिरी लेआऊट, गुलमोहर कॉम्प्लेक्स, इंदिरा नगर, पाटील नगर, धनगौरी कॉलनी, शिवकृपा कॉलनी आदी परिसरातून मार्गक्रमण केले. सकाळी ११.३० वाजता संघपुत्त बोधी विहार येथे भंतेजींच्या हस्ते पूजा व वंदना पार पडली. त्यानंतर रॅलीने ऋषिकेश कॉलनीचे विविध फेज गाठत दुपारी छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात समारोप केला.
भिलगावातील आंबेडकरी बांधवांनी उत्साहाने सहभाग घेत रॅलीला भव्यतेची परंपरा लाभवली. या धम्म रॅलीत देवदास राऊत, पृथ्वीराज डोंगरे, निखिल सावरकर, स्वाती गजभिये, अशोक टेंभुर्णे, विजय शेलारे, किशोर बारसागडे, ओमप्रकाश शेंडे, कमलेश गजभिये, सुरेश पाटील, देवानंद भोतमांगे, रत्नाकर उके, विठ्ठल उके, आशिक रामटेके यांच्या सह असंख्य उपासक उपासिकांचा समावेश होता