Home Latest News जि. प शाळा, नेवरीच्या मुख्याध्यापिका शोभिता कांबळे यांचा आदर्श शिक्षिका पुरस्काराने सन्मान

जि. प शाळा, नेवरीच्या मुख्याध्यापिका शोभिता कांबळे यांचा आदर्श शिक्षिका पुरस्काराने सन्मान

0
129

नेवरी ११ : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, नेवरीच्या मुख्याध्यापिका  शोभिता कांबळे यांना ५ सप्टेंबर २०२५ रोजी जिल्हा आदर्श शिक्षिका पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या जिल्हा आदर्श शिक्षक सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

या कार्यक्रमात एकूण १६ शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला मुख्य कार्यकारी अधिकारी  विनायक महामुनी, प्राथमिक शिक्षणाधिकारी निखील भुयार, माध्यमिक शिक्षणाधिकारी  गेडाम यांच्यासह प्रत्येक पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी आणि केंद्रप्रमुख उपस्थित होते.

या सोहळ्यात पंचायत समिती, कुही अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, नेवरीच्या मुख्याध्यापिका शोभिता प्रकाश कांबळे यांची जिल्हा आदर्श शिक्षिका म्हणून निवड करून त्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी पंचायत समिती, कुहीच्या गटशिक्षणाधिकारी आशाताई गणवीर, विस्तार अधिकारी अभिमन्यू वंजारी, फाळके, विजय घोरपडे आणि  उज्वला उके आदी मान्यवर उपस्थित होते.