मिशन रेबीज मोहिमेअंतर्गत मनपा २८ सप्टेंबरपर्यंत राबविणार मोहिम
नागपूर, ता. १२ : नागपूर महानगरपालिका द्वारा मोकाट कुत्र्यांची नसबंदी व रेबीज प्रतिबंधात्मक लसीकरणाबाबत राबविण्यात येत असलेल्या ‘मिशन रेबीज’ या मोहिमेअंतर्गत गेल्या 1 सप्टेंबरपासून ते 8 सप्टेंबरपर्यंत 325 कुत्र्यांचे लसीकरण करण्यात आले आहे. यामुळे ‘मिशन रेबीज’ या उपक्रमाला नागरिकाचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. ही लसीकरणाची मोहिम 28 सप्टेंबर पर्यंत चालणार आहे.
मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शन अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत यांच्या देखरेखीत शहरातील मोकाट कुत्र्यांची नसबंदी आणि रेबीज प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी ‘मिशन रेबीज’ उपक्रम राबविण्यात येत आहे. यातून मोकाट श्वानांच्या संख्येवर नियंत्रण येणार मदत होणार आहे.
वर्ल्ड वाईड व्हेटरनरी सर्व्हिसेस होप, मिशन रेबिज, निर्मिती पिपल्स अॅन्ड अॅनिमल वेलफेअर सोसायटी, नागपूर द्वारा सामूहिक श्वान रेबिज प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेची सुरुवात 1 सप्टेंबर 2025 पासून सुरु झाली आहे. या मोहिमेकरिता वर्ल्ड वाईड व्हेटर्नरी सर्व्हिस (डब्ल्यू व्हीएस) तर्फे लसीसह डॉक्टर आणि सहायक उपलब्ध करून देण्यात आले आहे. तर महानगरपालिकेतर्फे वाहन आणि श्वानांच्या लसीकरणासाठी लागणारे मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आले आहे. पहिल्यांदा मोठ्या प्रमाणात कुत्र्यांच्या लसीकरणाची मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
1 सप्टेंबरपासून सुरु झालेल्या या लसीकरण मोहिमेत 8 सप्टेंबर 2025 पर्यंत अखेर 325 श्वानाचे रेबिज प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात आले आहे.
याशिवाय नागपूर महानगरपालिकेच्या झोन निहाय कार्यक्षेत्रातील झोन क्रं. 1 ते 10 मध्ये आजारी, अपघातग्रस्त, पिसाळलेली, चावा घेणारी भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी झोन निहाय वाहन व्यवस्था करण्यात आली आहे. याकरीता भांडेवाडी, गोरेवाडा आणि महाराजबाग येथे पशु निवारा केंद्राची उभारणी केलेली असून औषधोउपचारानंतर पश्चात मुळ जागी सोडण्यात येत असते अशी माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाने दिली आहे.
8 सप्टेंबर पर्यंत लसीकरणाची माहिती
| अ.क्र | दिनांक | लसीकरण |
| 1 | 1 सप्टेंबर 2025 | 20 |
| 2 | 2 सप्टेंबर2025 | 75 |
| 3 | 3 सप्टेंबर 2025 | 25 |
| 4 | 4 सप्टेंबर 2025 | 37 |
| 5 | 5 सप्टेंबर 2025 | 56 |
| 6 | 6 सप्टेंबर 2025 | 58 |
| 7 | 8 सप्टेंबर 2025 | 55 |
| एकूण लसीकरण | 325 | |
तीन वर्षात 56 हजार 997 कुत्र्यांचे लसीकरण
शहरातील मोकाट प्राण्यांना हाताळणे व त्यांच्यावर नियंत्रणाच्या दृष्टीने नागपूर शहरामध्ये याकरीता भांडेवाडी, गोरेवाडा, आणि महाराजबाग प्राणी जन्म नियंत्रण केंद्र तयार करण्यात आले. या तीनही केंद्रात स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने मागील तीन वर्षापासून नागपूर महानगर कार्यकक्षेतील कु्त्र्यांचे नसबंदी शस्त्रक्रिया व अँटीरेबीज लसीकरण राबविण्यात येत आहे. मे. व्हेटस् फॉर ॲनिमल, सातारातर्फे भांडेवाडी केंद्रात 26 हजार 800, मे. कृष्णा सोसायटी फॉर ॲनिमल, पुणेतर्फे गोरेवाडा केंद्रात 22 हजार 794 आणि मे. स्वातंत्र्य ॲनिमल वेलफेअर सोसायटी, हैदराबाद हैद्राबादतर्फे महाराजबाग केंद्रात 7 हजार 403 असे एकूण 56 हजार 997 कु्त्र्यांचे लसीकरण करण्यात आले आहे.
तीन वर्षांतील प्राणी जन्म नियंत्रण केंद्रामधील लसीकरणाची माहिती
| अ.क्र | नावे | M | F | एकूण |
| 1. | मे. व्हेटस् फॉर ॲनिमल, सातारातर्फे भांडेवाडी केंद्र | 12773 | 14027 | 26800 |
| 2. | मे. कृष्णा सोसायटी फॉर ॲनिमल, पुणे तर्फे गोरेवाडा केंद्र | 12551 | 10243 | 22794 |
| 3. | मे. स्वातंत्र्य ॲनिमल वेलफेअर सोसायटी, हैदराबाद, महाराजबाग केंद्र | 3574 | 3829 | 7403 |
| एकूण | 28898 | 28099 | 56997 |
प्राणी प्रेमींना मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन
महानगरपालिकेतर्फे अँटी रेबीज लसीकरण मोहिमेत सहभागी होण्यासाठी प्राणी प्रेमींना आवाहन करण्यात आले आहे. प्राणीप्रेमींना त्यांची माहिती https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScCoeyLhuHmfrCIYA5cHQH9GmYK5lR7q5C6B1tgB0HVupEHZQ/viewform?pli=1. या गुगल फॉर्म भरून द्यावयाची आहे. त्यात आपले आपले नाव, पूर्ण पत्ता, झोनचे नाव, फोन नंबर, ईमेल आयडी, श्वानांना अन्न देण्याचे ठिकाण, त्या ठिकाणी असलेल्या श्वानांची संख्या, रेबीज लसीकरणाची स्थिती, आदी माहिती द्यावी भरावी लागणार आहे. त्यानंतर त्या ठिकाणी महानगरपालिकेचे कर्मचारी व स्वयंसेवी संस्थेचे डॉक्टर पोहचून कुत्र्याचे लसीकरण करणार आहेत.




