Home Latest News भालेराव महाविद्यालयात “विद्यार्थी संवाद” संपन्न

भालेराव महाविद्यालयात “विद्यार्थी संवाद” संपन्न

0
64

 

सावनेर १२ : महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने करिअर कट्टा या राज्यस्तरीय उपक्रमाच्या अंतर्गत विद्यार्थी संवाद अभियान राज्यभर सुरु आहे. या अभियानाचा एक भाग म्हणून स्थानिक भालेराव विज्ञान महाविद्यालयात विद्यार्थी संवाद मोठ्या उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्राचार्य डॉ. पराग निमिशे यांनी भूषविले. तसेच प्रमुख अतिथी यशवंत शितोळे, अध्यक्ष महाराष्ट्र माहीती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र, डॉ. शरयू तायवाडे, जिल्हा प्राचार्य प्रवर्तक, डॉ. वर्षा वैद्य, जिल्हा समन्वयक, करिअर कट्टा प्रामुख्याने व्यासपीठावर उपस्थित होते.
प्रमुख अतिथी शितोळे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना करिअर कट्टाची संकल्पना उलगडतांना स्पर्धा परीक्षा, रोजगार, स्वयंरोजगार, उद्योगातील संधी यावर सविस्तर विवेचन केले. मोबाईल चा उपयोग विद्यार्थ्यांनी सर्वांगीण विकासासाठी कसा करावा याचे सुद्धा परिणामकारक मार्गदर्शन केले. डॉ. शरयू तायवाडे यांनी ग्रामीण भागातील होतकरू विद्यार्थ्यांनी करिअर कट्टा सारख्या शासकीय उपक्रमांचा आणि तत्सम योजनाचा उपयोग करिअर साठी करावा असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचे संचालन तालुका समन्वयक चंद्रशेखर पोटोडे यांनी तर प्रास्ताविक प्रा. विलास डोईफोडे यांनी केले. आभार गीताश्री नवघरे यांनी मानले.
या प्रसंगी भालेराव महाविद्यालय, ह. आदमने महाविद्यालय, राम गणेश गडकरी महाविद्यालय, सरस्वती महाविद्यालय, रेवनाथ चौरे महाविद्यालय, के. डी. पवार महाविद्यालय येथील अनेक विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचा लाभ घेतला. प्रा. सुनील डोंगरे, प्रा. प्रकाश काकडे, प्रा. रवींद्र भाके, प्रा. प्रशांत डबरासे, प्रा. शोभा ताजने, प्रा. मीनल फुले, प्रा. कान्तेश्वर बोरीकर, प्रा. अभित पाटील, प्रा. सुशीला गायकवाड, प्रा. विद्या ठाकरे, प्रा. अर्चना देशमुख, प्रा. साक्षी श्रीखंडे, प्रा. समिक्षा भोले प्रामुख्याने उपस्थित होते. विलास सोहगपुरे, सुरेश मेंढे, मुकुंद सेंबेकर, हर्ष नाचणकर, तरुण मेहंदोले, वसुंधरा करडमारे, त्रिवेणी पाटील, हर्षला ढेपले,  उत्कर्षा चौधरी,  विशाखा झाडे,  रीना लंगडे, प्रगती भोयर, सेजल सूर्यवंशी, कुणाल दुधकवले यांचे मोलाचे सहकार्य केले.