Home Latest News गुन्हेशाखा अंमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई – एम.डी. पावडर बाळगणारा आरोपी...

गुन्हेशाखा अंमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई – एम.डी. पावडर बाळगणारा आरोपी अटक

0
57

 

नागपूर १२ : गुन्हेशाखा अंमली पदार्थ विरोधी पथकाने सापळा रचून मोठी कारवाई करत 36 वर्षीय आरोपीकडून अंमली पदार्थ जप्त केला आहे.

दिनांक 11 सप्टेंबर 2025 रोजी पहाटे 2.30 ते 4.10 वाजताच्या दरम्यान वाठोडा पोलीस ठाणे हद्दीत उमरेड रोड, जुना दिघोरी नाका जवळ राकेश पान पॅलेस समोर संशयित इसमाला अटक करण्यात आली. पोलिसांनी थांबविलेल्या विना नंबरच्या मोपेडवरील व्यक्तीने आपले नाव शफीक खान उर्फ अप्पु रफीक खान (वय 36, रा. राऊत नगर, वाठोडा, नागपूर) असे सांगितले.

त्याची अंगझडती घेतल्यावर त्याच्याकडील झिपलॉक पिशवीतून 102 ग्रॅम एम.डी. पावडर (किंमत अंदाजे 5,10,000 रुपये) मिळाली. तसेच आरोपीकडून एम.डी. पावडर, मोबाईल फोन आणि दुचाकी असा मिळून एकूण 5,90,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

चौकशीत आरोपीने सांगितले की त्याने आपल्या साथीदार फिरोज खान उर्फ हड्डी व साजीद उर्फ काजु (दोघेही रा. महेंद्र नगर, नागपूर) यांच्या मदतीने एम.डी. पावडर विक्रीसाठी आणली होती. स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी तो अंमली पदार्थ बाळगत असल्याचेही स्पष्ट झाले.

आरोपीविरुद्ध NDPS Act कलम 8(क), 22(क), 29 नुसार वाठोडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून आरोपीस अटक करून पुढील कारवाईसाठी वाठोडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पाहिजे आरोपींचा शोध सुरू आहे.

ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोनि गजानन गुल्हाने, सपोनि संदीप जाधव, पोहवा विजय यादव, अरविंद गेडेकर, मनोज नेवारे, विवेक अढाऊ, पोअं सहदेव चिखले, धनपत मझरेटे, अंकीत खरे, राहुल पाटील व मपोहवा अनुप यादव यांनी केली.