Home Latest News परिचारिका हाच रुग्णालयाचा पाया” मात्र परीचारीकेच्या असभ्य वागणूकीने रुग्ण त्रस्त

परिचारिका हाच रुग्णालयाचा पाया” मात्र परीचारीकेच्या असभ्य वागणूकीने रुग्ण त्रस्त

0
77

 

– पांढरकवडा उपजिल्हा रुग्णालयातील प्रकार

पांढरकवडा :- नर्स / सिस्टर परिचारिका म्हणजे रुग्णालयाच्या पाठीचा कणा आहे. परिचारिकेशिवाय रुग्णालय ही कल्पनासुद्धा करवत नाही. कुटुंबात जशी आई असते तशीच परिचारिका ही रुग्णालयाचा पाया आहे. प्रत्येक आई, स्त्री ही कळत – नकळत एक उत्तम परिचारिका असते, हे सत्य नाकारता येणार नाही. मात्र पांढरकवडा उपजिल्हा रुग्णालयात याहीपेक्षा उलट परिस्थिती सद्यस्थितीत निर्माण होऊन दिसत आहे. येथील उपजिल्हा रुग्णालयात मोठ्या संख्येने तालुक्यातील आदिवासी, ग्रामीण भागातील व शहरी झोपडपट्टी भागातील आर्थिकदृष्टया दुर्बल असलेले रूग्ण औषधोपचाराकरिता येतात. उपचारासाठी येणाऱ्या रूग्णांसोबत व त्यांच्या नातलगांसोबत रुग्णालयातील कर्मचारी, परीचारिका हे गैरव्यवहार करतात. यासोबतच रूग्णालयात रुग्णांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. परीचारीकेच्या असभ्य वागणूकीने रुग्ण त्रस्त झाले आहेत. रक्त तपसाणीचे रुग्ण असो वा कोणत्याही रुग्णांना चाचणी घेतांना परीचारीका यांच्याकडून रूग्णांसोबत व त्यांच्या नातलगांसोबत गैरव्यवहार करण्यात येतो. या गंभीर विषयांची उपजिल्हा रुग्णालयांतील वैद्यकीय अधीक्षकांनकडून दखल घेण्यात यावी अशी मागणी त्रस्त रुग्णांनी केली आहे. आदिवासी बहुल भागातील अशिक्षित रुग्णांना तर अत्यंत वाईट वागणूक मिळत असल्याचेही सांगितले जाते.