राष्ट्रीय कुराश स्पर्धेत पदक विजेत्या विद्यार्थी खेडाळु चे जंगी स्वागत

0
199

कन्हान :- नुकत्याच रायपुर येथे संपन्न झालेल्या राष्ट्रीय कुराश स्पर्धा सबजुनियर चैम्पियनशिप २०२५ -२६ या स्पर्धेत बीकेसीपी स्कुल कन्हान च्या खेडाळुनी दोन स्वर्ण व दोन कास्य पदक पटकावित आई, वडीलांचे, बीकेसीपी शाळा आणि कन्हान – कांद्री शहराचे नावलैकिक केल्याने विजयी विद्यार्थी खेडाळु आणि क्रिडा प्रशिक्षकाचे शीतला माता मंदीर कमेटी व्दारे स्वागत करून भव्य सत्कार करण्यात आला.

रायपुर येथे संपन्न राष्ट्रीय कुराश स्पर्धा सबजुनियर चैम्पियनशिप २०२५-२६ या स्पर्धेत बीकेसीपी स्कुल कन्हान च्या खेडाळुनी महाराष्ट्र व नागपुर जिल्हयाचे प्रतिनिधीत्व क्रिडा प्रशिक्षक अमितकुमार ठाकुर यांच्या मार्गदर्शनात करून बिहार, पंजाब व हरियाणा येथील खेडाळुशी लढत देऊन विजयश्री खेचुन आणत घवघवीत यश संपादित केले. यात १) वैष्णवी रविंद्र कोतपल्लिवार इयत्ता ७ वी हिने -३२ किलो. वजन गटत स्वर्ण पदक पटकाविले. २) जिया अविनाश कांबळे इयत्ता ९ वी हिने – २८ किलो वजन गटात स्वर्ण पदक, ३) लावण्या प्रविण होले इयत्ता ९ वी हिने – ४८ वजन गटात कास्य पदक, ४) वेदांत विष्णु कुथे इयत्ता ८ वी हयाने – ३० वजन गटात कास्य पदक पटकावुन विजयी होऊन शाळेचे व कन्हान- कांद्री शहराचे देशात नाव लौकिक करून शहरात आगमन होताच जय शीतला माता मंदिर मेन रोड कांद्री कन्हान येथे रविवार (दि.१५) सप्टेंबर ला सायंकाळी ५ वाजता शीतला माता मंदीर कमेटी व्दारे क्रिडा प्रशिक्षक अमितकुमार ठाकुर सह विजेत्या विद्यार्थी खेडाळुंचे भव्य स्वागत करून पुष्पहार, शाल, श्रीफळाने सत्कार करण्यात आला.

तदंतर वाजत गाजत मिरवणुकीसह  वैष्णवी रविंद्र कोतपल्लिवार च्या घरी पोहचुन तिथे ही औषवंत व मिठाई खाऊ घालुन स्वागत करण्यात आले. भोजन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. याप्रसंगी संजय चौकसे, वामण देशमुख, महेश मंगतानी, पारस मरघडे, चंद्रशेखर बावनकुळे, प्रकाश ढोके, वसंता राऊत, गोकुल पटेल, प्रेमचंद चव्हाण, चंद्रशेखर कळमदार, ओमदास लाडे, रोहित वासनिक व भुमीपुत्र प्रतिष्ठानचे अतुल हजारे, शिवाजी चकोले, नंदु पोटभरे, गुरुदेव चकोले, सौरभ पोटभरे, हर्षल सीरिया, विजय पोटभरे, ग्रामिण पत्रकार संघ कन्हान अध्यक्ष मोतीराम रहाटे, ऋृषभ बावनकर, किशोर वासाडे, शुभम बावनकर, पालक रविंद्र कोतपल्लिवार, अजय ठाकरे, प्रविण होले, अविनाश कांबळे, दिनेश खाडे, विष्णु कुथे, सुभाष मदनकर, शारिक अंसारी, राज झुनझुनकर, हर्षल बढेल, महिला अरुणा हजारे, सुनंदा कोतपल्लीवार, आरती कोतल्लीवार, मनिषा कांबळे क्रिडा शिक्षिका रेणु राऊत सह नागरिकांनी उपस्थित राहुन विजयी विद्यार्थी खेडाळुचे स्वागत केले.