तिरोड़ा :- बुद्धांच्या करुणा, समता आणि मैत्रीचा संदेश समाजात दृढ करण्यासाठी आपल्या तिरोड़ा शहरात महाबोधी महाविहार मुक्ती च्या समर्थनार्थ धम्म ध्वज यात्रा आणि धम्मदेशना कार्यक्रम दिनांक 21 सप्टेम्बर 2025 रोज रविवार ला शहीद मिश्रा विद्यालयाचे प्रांगणावर सकाळी 10.00 वाजता आयोजित करण्यात येणार आहे.
कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती भंते ज्ञानज्योती महाथेरो, भंते विनाचार्य तसेच भिक्खुसंघ यांची राहणार आहे. धम्ममार्गाचे उपदेश आणि प्रेरणा समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांची धम्मदेशना अत्यंत मोलाच ठरणार आहे.धम्म ध्वज यात्रा शहरातील प्रमुख मार्गाने काढण्यात येणार असून, त्यात समाजातील विविध घटकांचा सहभाग असेल, त्यामध्ये तालुक्यातील संपूर्ण बुद्ध विहाराचे पदाधिकारी, सदस्यगण, उपासक, उपसिका आणि बुद्धिस्ट संस्था उपस्थित राहणार आहेत. या यात्रेद्वारे बौद्ध धम्माच्या विचारांची जागरूकता, एकता व सामूहिक भावना अधिक बळकट होणार आहे.
यात्रेनंतर होणाऱ्या धम्मदेशना कार्यक्रमात बुद्धांच्या शिकवणीचे महत्व, अष्टांगिक मार्ग आणि आजच्या काळातील त्यांचे सामाजिक व नैतिक योगदान, तसेच तरुण पिढीसमोरील आव्हाने आणि उपाय, अंध श्रद्धा, थोतांड, कर्मकांड आणि बुद्ध धम्मातिल आर्यसत्य याविषयी थोर भंते समाजाचे मार्गदर्शन करतील.
या कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्टे म्हणजे समाजात समता, मैत्री व बंधुत्वाचा संदेश पोहोचवणे, बुद्धांच्या धम्म शिकवणीची जागरूकता वाढवणे, समाजातील नव्या पिढीस प्रेरणा देणे,सामाजिक ऐक्य व संघटितपणा निर्माण करणे, आणि विश्व शांती चा संदेश प्रस्थापित करने होय. तालुक्यातील सर्व समाजबांधवांनी, युवक-युवतींनी, बौद्ध अनुयायांनी तसेच सर्व धर्मीय नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन कार्यक्रमाला यशस्वी करावे, असे आवाहन महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन समिती च्या आयोजकांनी केले आहे.



