मंत्री आशीष शेलार यांची रेड्डी यांच्या कार्यालयाला सदिच्छा भेट

0
65

सचिन चौरसिया,रामटेक :- राज्याचे माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी रामटेक दौऱ्यात माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांच्या कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. मल्लिकार्जुन रेड्डी यांनी त्यांचे स्वागत केले.

याप्रसंगी वित्त व कामगार कल्याण राज्यमंत्री आशिष जयस्वाल, भाजपा जिल्हाध्यक्ष आनंदराव राऊत, जिल्हा उपाध्यक्ष उदयसिंह (गज्जू) यादव, जिल्हा उपाध्यक्ष संजय मुलमुले, माजी जिल्हा परिषद सदस्य सतीश डोंगरे, भाजपा मंडळ अध्यक्ष योगेश मात्रे, भाजप शहर अध्यक्ष रजत गजभिये, आलोक मानकर, उमेश पटले, चंदू बैस आणि भाजपा परिवारातील सदस्य उपस्थित होते.