शाळा वाचवा, शिक्षण वाचवा मौदा तालुका समिती तर्फे जि प शाळेतील विविध समस्या सोडवण्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी यांना निवेदन

0
145

किशोर साहू, मौदा, ता. 19:- जिल्हा परिषद शाळांना पुन्हा गत वैभव प्राप्त करून देण्यासाठी, जि प शाळेतील विविध समस्या सोडविण्यासाठी त्या समस्यांचे निवेदन मंगळवार (दि.16 सप्टेंबर)ला शाळा वाचवा, शिक्षण वाचवा मौदा तालुका समिती व तालुक्यातील विविध शाळेतील शालेय समितीचे अध्यक्षांच्या वतीने जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी व शिक्षणाधिकारी यांना देण्यात आले.

निवेदनात शैक्षणिक सत्र 2025 – 26 मध्ये झालेल्या शिक्षकांच्या बदल्या शैक्षणिक सत्र च्या शेवटी किंवा उन्हाळी सुट्ट्यांमध्ये करावे, ज्या शाळेत शिक्षकांची कमतरता आहे त्या शाळेत लवकरात लवकर शिक्षक किंवा स्वयंसेवक पुरविण्यात यावे , प्रत्येक शाळेत मुलींच्या समस्या जाणून घेण्यासाठी ज्या शाळेत महिला शिक्षिका नाही अशा शाळेत एक महिला शिक्षक नियुक्त करावे, आदर्श शाळेला पुरेसे मनुष्यबळ आणि शैक्षणिक सुविधा पुरवावे, हे विषय नमूद करण्यात आलेले आहे.

निवेदन देताना शाळा वाचवा शिक्षण वाचवा तालुकास्तरीय समिती अध्यक्ष टीकाराम सपाटे, उपाध्यक्ष किरण बरबटे, सचिव रोशन मते सदस्यगण नरेंद्र बाघाये,उदय पांडे, अरविंद भोयर ,हिरालाल लांजेवार, विजय भोयर ,राजेंद्र पिसे, जगदीश वाडीभस्मे, डॉ. रंगारी , नितेश इंगळे, रणधीर आंबिलढूके ,अक्षय आकरे , अपर्णा घरडे, मोसमी घरडे, कविता मडावी सह तालुक्यातील विविध शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपस्थित होते.