Home Latest News बंद घराचे कुलुप तोडुन नगदी २५ हजार रुपये चोरी

बंद घराचे कुलुप तोडुन नगदी २५ हजार रुपये चोरी

0
98

– खंडाळा (घटाटे) येथील घटना, कन्हान पोस्टे ला गुन्हा दाखल

कन्हान :- पोलीस स्टेशन अंतर्गत खंडाळा (घटाटे) शिवारात अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलुप तोडुन आत प्रवेश करुन नगदी २५ हजार रुपये चोरुन नेल्याने कन्हान पोस्टे ला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बेबी बबनराव नागपुरे ( वय५५ ) रा. खंडाळा (घटाटे) यांचे पती बबन नागपुरे यांना बाथरुम चा त्रास असल्याने शनिवार (दि.३०) ऑगस्ट ला दुपारी २ वाज ता बेबी आपल्या पतीला घेऊन घराला कुलुप लाऊन नागपुर येथे उपचार करण्याकरिता खाजगी रुग्णालया त गेली आणि उपचार करुन आपल्या मुलीकडे मुक्कामाने राहिली. सोमवार (दि.१५) सप्टेंबर रोजी सकाळी ७:३० वाजता दरम्यान पुतन्या राजेश गोपिचंद नागपुरे (वय ४१) यांनी बेबी ला फोन करुन विचारले कि, काकु तुम्ही घरी परत आले का ? काकु ने म्हटले मुली कडेच आहे. पुतन्याने घराचे दार उघडे आहे असे सांगि तले असता बेबी पतीला घेऊन घरी आली. तेव्हा वाल कंपाऊंड चे गेटचे कुलुप लागले होते व घराचे दार उघ डे दिसले. बेबीने गेटचे कुलुप उघडुन घराचे आत प्रवेश केला असता रुम मधिल लोखंडी गोदरेज आलमारीत ठेवलेल्या सुटकेस मधिल साड्या फेकफाक केलेल्या दिसल्या. तसेच त्यामध्ये ठेवलेले नगदी २५,००० रुपये दिसुन आले नाही. शनिवार (दि.३०) ऑगस्ट ते सोम वार (दि.१५) सप्टेंबर रोजी दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलुप तोडुन आत प्रवेश करुन नगदी २५,००० रुपये चोरुन नेल्याने कन्हान पोलीसां नी बेबी नागपुरे यांचा तक्रारीवरून अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे यांचा मार्गदर्शनात कन्हान पोलीस करित आहे.