spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

सिल्ली ते खेडेपार रस्ताला पडले खड्डे चार महिन्यांपूर्वी रस्ताचे झाले होते बांधकाम प्रहार वतीने आंदोलन इशारा

तिरोडा :- तालुक्यातील नुकताच तयार केलेला सिल्ली ते खेडेपार रस्ताला जागोजागी खड्डे पडले असल्याने नागरिकांनी त्रास सहन करावा लागत आहे.

सिल्ली ते खेडेपार गावाचे अंतर 5 ते 6 किलोमीटर असून रस्त्याचे नुकतेच बांधकाम 4 महिन्यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागा अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात आले असल्याची माहिती मिळत आहे .

या रस्त्याला मोठे मोठे खड्डे पडले असून रस्त्यांनी प्रवास करणाऱ्या खड्डे वाचवून वाहन चालवावे लागत आहे . खड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा अशी परिस्थिती दिसून येत आहे.

या रस्त्याने ये जा करणे वाहनधारकांना धोकादायक ठरू शकते. रात्रीच्या वेळी तर या रस्त्याने कुणी प्रवास केले तर अपघात नक्कीच झाल्याशिवाय राहणार नाही. या रस्त्याचे बांधकाम करणारे अधिकारी व ठेकेदारावर गुन्हा दाखल करा ‌अन्यथा प्रहार पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचे प्रहार जनसक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र भांडारकर यांनी सांगितले आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.