spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

सरस्वती नगरात तन्मयने साकारली कामाख्य देवीच्या सहा मुखाची सुंदर मूर्ती

– सहा मुखुटाची कामख्य देवीचे सुंदर स्वरूप प्रथमच साकारले

नागपूर :- दक्षिण नागपूरातील मानेवाडा रिंग रोड वरील सरस्वती नगर येथील तन्मय सुभाष ठाकरे यांच्या घरचे हे ७ वे वर्ष आहे. त्यांनी नवदुर्गा उत्सव मंडळ असे नाव दिले आहे. परंतु या मंडळामध्ये कोणीही अध्यक्ष व सचिव नाहीत ! -तन्मय ठाकरे यांचे मित्रमंडळी व एरियातील युवक तनमनधनाने या मंडळाला सहकार्य करत असतात. यावर्षी कामख्य देवीचे रूप तयार करून हि सहा मुखी मूर्ती प्रथमच तयार केली आहे. तन्मय ठाकरे ला लहान पणापासूनच मूर्ती बनविण्याचा छंद आहे आणि मुर्त्या बनवता बनवता आज तन्मय देवीची मूर्ती वेगवेगळ्या प्रकारे तयार करतो. असं त्यांच्या दिमाखात कशा पद्धतीचे येते हे देवीचं जाणे ! प्रत्येक वर्षी देवीचं नवीन रूप अशा पद्धतींची तो मूर्ती बनवितो !

हे विशेष…यावेळी सोबतचे मित्र अंशुल नेवारे, नयन ठाकरे, ऋषी घाटे, गौरव गिऱ्हे, प्रणय कटरमल, नयन किन्हेकर, क्रिश इरपाची, संकेत कुरेवार, दर्शन किन्हेकर, गौरव नायगावकर व मंथन आणि शुभम बुराडे या सर्वाच्या सहकार्याने नवदुर्गा उत्सव मंडळाला मदत करतात.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.