भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा नागपूर महानगर तर्फे सेवा पंधरवाडा अंतर्गत भव्य महिला पक्ष प्रवेश

0
137

नागपूर :- देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसा निमित्ताने भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा नागपूर महानगर तर्फे सेवा पंधरवाडा अंतर्गत भव्य महिला पक्ष प्रवेश कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. २१ सप्टेंबर रोजी, जरीपटका येथील महात्मा गांधी शाळेत आयोजित कार्यक्रमात मुख्य अतिथी प्रदेश भाजप उपाध्यक्ष संजय भेंडे, माजी आमदार गिरीश व्यास आणि माजी आमदार मिलिंद माने, भारतीय जनता पक्षाच्या राज्य व्यापार आघाडीचे अध्यक्ष विक्की कुकरेजा, महिला मोर्चाच्या अध्यक्षा, दिव्या धुरडे, वंदना  शर्मा, स्वाती आखतकर कार्यक्रमाच्या मुख्य संयोजक मोहिनी रामटेके उपस्थित होत्या. कार्यक्रमात उत्तर नागपूर मंडळचे अध्यक्ष ओमप्रकाश इंगळे, संजय चौधरी, संजय तरारे, रुपेश ठाकरे मंडल अध्यक्षा, ममता प्रजापती, सरिता माने, पुष्पा किरपाने, शशांक समुद्रे, रुणाल चव्हाण, शुभम पाली, बाड़ू पराते, प्रवीण चवरे, आंनद लवनकर, प्रतीक्षा चवरे, वैशीली साखरे प्रीति बहादुरे, मारिया लवनकर, सीमा सहारे, पिंकी पाटिल, साधना वाघमारे, पूजा मोरयानी, गुंजा बिनकरसह कार्यक्रमाला शेकडो महिला कार्यकर्त्यां उपस्थित होत्या. महिला मोर्चाच्या अनेक वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना शाल व सन्मानचिन्ह देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमात शेकडो महिला कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. कार्यक्रमाच्या मुख्य आयोजक मोहिनी रामटेके यांनी सर्वांचे आभार मानले.