spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

सिटू तर्फे महसूल कर्मचारी आंदोलनाला पाठिंबा

– ४ ऑक्टोबरला राज्य अध्यक्ष डॉ.डी. एल.कराड संबोधित करणार

नागपूर :- आशा व गटप्रवर्तक कर्मचारी युनियन (सी आय टी यू) तर्फे विदर्भ महसूल सेवक संघटनेतर्फे महसूल सेवक (कोतवाल) यांना चतुर्थश्रेणीचा दर्जा देऊन किमान वेतन मिळावे. या मागणी करता सप्टेंबर पासून नागपूरच्या संविधान चौकामध्ये धरणे आंदोलन सुरू आहे. वरील धरणे आंदोलनामध्ये भेट देऊन आशा व गटप्रवर्तक कर्मचारी युनियन (सी आय टी यू) चे अध्यक्ष व सीटू राज्य कमिटी सदस्य कॉ. राजेंद्र साठे यांनी आंदोलन स्थळी जाऊन संघटनेचे अध्यक्ष रवींद्र बोदेले सह इतर पदाधिकारी समक्ष समर्थन पत्र सुपूर्द करून सी आय टी यु यांचे पाठीशी आहे. असे आपल्या संबोधनांमध्ये म्हटले. कॉ. राजेंद्र साठे यांनी पुढे सांगितले की महसूल सेवक कर्मचाऱ्यांच्या मागण्या देवापर्यंत मान्य होणार नाही तेव्हापर्यंत आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहणार येत्या ऑक्टोबर रोजी सी आय टी यु चे राज्य अध्यक्ष काँ. डी.एल.कराड संबोधित करण्याकरता स्वतः उपस्थित राहणार असून, शेकडो आशा वर्कर्स व गटप्रवर्तक सुद्धा महसूल कर्मचाऱ्यांच्या पाठीशी संविधान चौकात उपस्थित राहणार. आशा वर्कर व गटप्रवर्तक यांना केंद्राचे जानेवारीपासून मानधन नाही. ऑनलाईन डाटा एन्ट्रीची सक्ती केल्या जात आहे, वयाची मर्यादा ६० वर्ष ठेवण्यात आली असून ती रद्द करून ५ लाख रुपये ग्रॅज्युटी व १० हजार रुपये मासिक पेन्शन लागू करा. या मागणी करता सुद्धा आशा वर्कर व गटप्रवर्तक महसूल कर्मचाऱ्यांसोबत धरणे आंदोलन करणार. अशी माहिती एका परिपत्रकाद्वारे संघटनेतर्फे जारी करण्यात आली.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.