spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

स्मार्ट सार्वजनिक शौचालयाचे उद्घाटन

नागपूर :- मनपातर्फे अंबाझरी दहन घाट परिसरात अत्याधुनिक स्मार्ट सार्वजनिक शौचालय उभारण्यात आले आहे. अंत्यविधी करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना या सुविधेचा लाभ घेता येईल. गुरुवारी(ता.२५)या शौचालयचे उद्घाटन धरमपेठ झोनचे सहाय्यक आयुक्त राजकुमार मेश्राम यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी कार्यकारी अभियंता कमलेश चव्हाण, मनोज गद्रे, उपअभियंता मनोज रंगारी, देवेंद्र भोवते उपस्थित होते. नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन मनपाद्वारे करण्यात आली आहे.

Popular Articles