कामठी :- क्रीडा व युवक संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत आयोजित आष्टाळू आखाडा शिवकला टूर्नामेंट दिनांक 23 ते 24 सप्टेंबर 2025 ला कवी सुरेश भट सभागृह रेशीम बाग नागपूर येथे आयोजित करण्यात आली होती.या स्पर्धेमध्ये विविध शाळांनी भाग घेतलेला होता. यामध्ये एस के पोरवाल कॉलेजची अंडर नाईन्टीनची मुलगी रागिनी शंकर ठाकरे हिला प्रथम स्थान मिळवून तिचे चयन विभागीय स्तरासाठी झालेले आहे कॉलेजच्या प्राध्यापिका डॉक्टर मल्लिका नागपुरे यांचे मार्गदर्शन रागिणीला मिळाले तसेच कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर स्वप्नील दाहात व उपप्राचार्य डॉक्टर सुधीर अग्रवाल तसेच पर्यवेक्षक वी बी वंजारी यांनी रागिनी ठाकरेचे अभिनंदन करून पुढच्या विभागीय स्तराच्या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
जिल्हास्तरीय फ्री स्टाईल कुस्ती मध्ये पोरवाल कॉलेजची रागिनी शंकर ठाकरेची विभागीय स्तरावर निवड









