– जिल्हाधिकाऱ्यांचा गावकऱ्यांशी संवाद व ग्रामविकास आराखड्यावर चर्चा
यवतमाळ :- जिल्हाधिकारी विकास मीना यांनी आज छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत सेवा पंधरवडा निमित्त पाचपोहर या गावास भेट दिली आणि अभियान अंतर्गत घेण्यात आलेल्या शिबिरामध्ये तेथील ग्रामस्थांशी वेगवेगळ्या शासकीय योजना व दाखल्यांचा लाभ -वाटप करण्यांत आले आणि नागरिकांसह विविध विषयांबाबत विस्तृत चर्चा केली.
त्यामध्ये प्रामुख्याने जिल्हाधिकारी सर यांनी आदी-कर्मयोगी अभियान अंतर्गत आदी- सेवा केंद्र यांचे उद्घाटन केले. या केंद्राव्दारे वेगवेगळ्या विभागांच्या योजनांचा लाभ आदिवासी ग्रामस्थांना होणार आहे.
तसेच सेवा पंधरवडाचे उद्दिष्ट ग्रामस्थांना समजावून सांगितले व उपस्थित अधिकारी वर्ग यांना सूचनाही दिल्या. यामध्ये पीएम-धरती आबा व आदि- कर्मयोगी अभियान, सशक्त ग्रामपंचायत अभियान, मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत अभियान, छत्रपती शिवाजी महाराज महा: राजस्व अभियान, मिशन उभारी (आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांसाठी), महिला बचत गट (उमेद) आदींविषयी जिल्हाधिकारी यांनी ग्रामस्थांशी चर्चा केली.

जिल्हाधिकारी यांनी ग्राम विकास आराखडा यामध्ये सहभाग घेतला आणि तो कसा बनवता येईल हे ग्रामस्थांना समजावून सांगितले. ज्या मध्ये पांदण रस्ता, गावठाण जमीन, शाळा, अंगणवाडी केंद्र, आरोग्य केंद्र यांना मूलभूत सुविधा मिळाव्यात , विद्यार्थ्यांना सुसज्ज वाचनालय, बचत गट यांना ग्राम संघ भवन, माती संवर्धन, पाणी संवर्धन, इत्यादी ग्राम विकास आराखडा यामध्ये प्राधान्याने समावेशित करता येईल ; ज्यामळे गावाचा सर्वांगीण विकास होईल.
जंगलाचा उपजीविकेसाठी योग्य तो वापर व्हावा आणि पशुपालन व सलग्नित सेवा ह्यादेखील ग्रामस्थांना वेळोवेळी मिळाव्यात यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्या गावातील विद्यार्थी चमकावेत यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे पालकांनी विद्यार्थ्यांना वर्ग पाचवी आणि आठवी साठी असणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेला विद्यार्थ्यांना बसवण्याचे आव्हान केले ; ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनातील परिक्षेबद्दल ची भीती संपेल, असं त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाला उपस्थित जिल्हाधिकारी विकास मीना यांच्यासह अमित रंजन, सहाय्यक जिल्हाधिकारी, केळापूर, अक्षय रासने, तहसीलदार, झरी जामणी रवींद्र कुमार सांगळे, गटविकास अधिकारी, पंचायत समिती, झरी जामणी राकेश दासरवार , तालुका कृषी अधिकारी, झरि जामणी डॉ. मोहन गेडाम, तालुका आरोग्य अधिकारी, झरी जामणी निलेश खैरनार, गटशिक्षणाधिकारी, ग्रामसेवक, तलाठी अन्य अधिकारी/कर्मचारी, सरपंच आणि ग्रामस्थ उपस्थित होते.



