– आरोपी विरुद्ध एन. डी. पी. एस. कायदयान्वये गुन्हा नोंद : एलसीबीच्या कारवाई नंतर अमली पदार्थ पथकावर प्रश्नार्थक चिन्ह
कन्हान :- कन्हान पोलीस स्टेशन हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गांजा विक्री करणाऱ्या आरोपीला अटक केली व त्यांच्या कडून ३४० ग्रॅम वाजनाचा अंमली पदार्थ गांजा सह एकूण १६,८०५ रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे यांच्या मार्गदर्शनातील पथकाने सदर कारवाई पोलीस स्टेशन कन्हान हद्दीत (दि.२४ सप्टेंबर )रोजी केली. यात अजय भाउराव पडघाने, वय ३९ वर्षे, रा. पटेलनगर पिपरी असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक अवैध धंदयावर कारवाई कामी पेट्रोलींग करीत असतांना पोलीसांना गुप्त बातमीदाराने खात्रीशीर माहीती दिली की, पोलीस स्टेशन कन्हान हद्दीत आरोपी नामे अजय भाउराव पडघाने, रा. पटेलनगर पिपरी, कन्हान त्याचे रॉयनगर येथील गायचे गोठयात बसुन अंमली पदार्थ गांजा बाळगुन गांजाची विक्री करत आहे. मिळालेल्या महीतीच्या आधारे पोलीसांनी घटनास्थळी जावुन सापळा रचुन अरोपी नामे अजय भाउराव पडघाने, वय ३९ वर्षे, रा. पटेलनगर पिपरी, कन्हान याला ताब्यात घेवुन त्याची पंचासमक्ष गायीच्या गोठयाची झडती घेतली असता नमुद ठिकाणी अंमली ३४० ग्रॅम वाजनाचा काळपट रंगाचा पान फुले बीया बोंडे असलेल उग्र वासाचा ओलसर गांजा सदृश्य पदार्थ मिळुन आला. पोलीसांनी नमुद आरोपीच्या ताब्यातुन १) ३४० ग्रॅम वाजनाचा अंमली पदार्थ गांजा किंमती ६,८०० /- रुपये, २) एक ओपो कंपनीचा मोबाईल आणि इतर साहीत्य असा एकुण १६,८०५ /- रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आला आहे.
आरोपी नामे अजय भाउराव पडघाने, वय ३९ वर्षे, रा. पटेलनगर पिपरी, कन्हान याच्या विरूध्द एन. डी. पी. एस. कायदयान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
अमली पदार्था विरोधी कारवाई करिता नागपूर ग्रामीण पोलिसांचे विशेष पथक :
अमली पदार्था विरोधी कारवाई करिता नागपूर ग्रामीणच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी विशेष पथकाचे निर्माण केले आहे ज्यात जिल्ह्यातील विविध ठाण्यातून कार्यक्षम पोलीस कर्मचाऱ्याचे समावेश करण्यात आले आहे. शिवाय यावर आळा बसवण्यासाठी पोलिसांच्या मार्फत जनजागृती कार्यक्रम सुद्धा घेण्यात येत आहे पण कन्हान या ठिकाणी अमली पदार्थ विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईने ह्या अमली पदार्थ विरोधी पथकाच्या कारवाई कडे प्रश्नचिन्ह निर्माण केले.
कन्हानच्या कांद्री ,पिपरी व खदान सह इतर ठिकाणी अमली पदार्थ विक्री व सेवन होत असून या नशेत तरुणवर्ग अपराधिक गतिविधि कडे वळताना दिसत आहे. आणि अमलीपदार्थ कारवाई किचकट असल्याने ह्या कारवाई या पूर्वी कमी होत होत्या किंतु नागपूर ग्रामीण पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी याकडे विशेष लक्ष केंद्रित केले असून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कारवाया होत आहेत. तरी कन्हान मध्ये स्थानिक गुन्हे शाखेने केल्या ह्या कारवाई मुळे कन्हान पोलिस व अमली पदार्थ विरोधी पथकाकडे प्रश्नार्थक पाहिले जात आहे .हे विशेष अमली पदार्थ विरोधी पथकात कन्हान पोलिस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्याचे या पथकात समावेश आहे.कारवाई मुळे कन्हान पोलिस व अमली पदार्थ विरोधी पथकाकडे प्रश्नार्थक पाहिले जात आहे.








