यवतमाळ :- नवरात्रोत्सवाचे औचित्य साधत अष्टमीच्या पवित्र दिवशी जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, यवतमाळ यांच्या वतीने पी.सी.पी.एन.डी.टी. विभाग अंतर्गत स्त्री भ्रूण हत्या प्रतिबंधक जनजागृतीसाठी विशेष उपक्रम राबविण्यात आला.या उपक्रमाअंतर्गत जिल्हा महिला व बाल रुग्णालयात जन्माला आलेल्या नवजात मुलींचे व त्यांच्या मातांचे सन्मानपूर्वक स्वागत करून स्त्री जन्माचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
कार्यक्रमाला डॉ. सुखदेव राठोड जिल्हा शल्य चिकित्सक, सामान्य रुग्णालय यवतमाळ, डॉ. सुनिता बानोळे रोग तज्ञ, जिल्हा महिला व बाल रुग्णालय, मुकुंद सयाम (प्रशासकीय अधिकारी), अॅड. पूनम महात्मे (पी.सी.पी.एन.डी.टी. विधी समुपदेशक), अर्चना मिसळ (परिसेविका), डॉ. प्रशांत कनाके (वैद्यकीय अधिकारी कविता पाठक (कार्यालयीन सहाय्यक व वैशाली मुलकर कार्यक्रम सहाय्यक यांच्यासह अनेक अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.




