spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

खापा येथे महाराजस्व शिबिर संपन्न, नागरिकांना विविध शासकीय योजनांचे प्रमाणपत्र वाटप

खापा, वार्ताहर :- छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत दि. १ ऑक्टोबर रोजी सावनेर तालुका प्रशासनाच्या वतीने खापा येथील राधाकृष्ण मंगल कार्यालयात एक दिवसीय विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरामध्ये शासनाच्या विविध लाभ योजनांचा लाभ नागरिकांना थेट देण्यात आला.

या शिबिराचे उद्घाटन आमदार डॉ. आशिष देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी संपत खलाटे होते. यावेळी तहसीलदार अक्षय पोयाम, खंडविकास अधिकारी मनोजकुमार हीरुडकर, कृषी अधिकारी सोमनाथ साठे, ठाणेदार किशोर भुजाडे, राजीव पोद्दार, मनोहर कुंभारे, रामराव मोवाडे, पियुष बुरडे, खेमराज बारापात्रे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

यावेळी बोलताना आमदार डॉ. आशिष देशमुख म्हणाले की, “सावनेर तालुक्यातील प्रत्येक नागरिकांच्या अडचणी सोडविण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. अनेक वेळा नागरिकांना तालुक्याच्या ठिकाणी जाणे शक्य होत नाही, म्हणूनच प्रशासनातील अधिकार्‍यांना घेऊन मी असे शिबिरे थेट शहरात राबवत आहे, जेणेकरून नागरिकांना थेट लाभ मिळावा म्हणून..

शिबिरामध्ये विविध योजनांअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना आमदार देशमुख यांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. यामध्ये पंतप्रधान आवास योजना, श्रावणबाळ योजना, संजय गांधी निराधार योजना, वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना आदींचा समावेश होता.

कार्यक्रमास बाबा बुराण, रवि खुबाळकर, राजेशचंद्र बुरडे, निखिल आष्टनकर, देवाजी बोरकर, अमोल भुते, मुन्ना शर्मा, पिंकू कठौते, शैलेश निकोसे यांच्यासह अनेक भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राज पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन नायब तहसीलदार संजय अनवाने यांनी मानले.

Popular Articles